नताशाचा ‘फ्रेश’ कट अन् हार्दिक पांड्या ‘घायाळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यावर्षी क्रिकेटर हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड नताशा स्टॅंकोव्हिचसोबत साखरपुडा करुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या साखरपुड्याची बातमी स्वतः हार्दिकने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या कपलची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप रंगली होती. पण आता नताशाने असे काहीतरी केले आहे ज्यामुळे हार्दिक त्यावर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

नुकतेच नताशाने तिचा नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नताशा एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. फोटोत तिने हेअरकट केलेला दिसत आहे. फोटोला तिने ‘फ्रेश कट’ असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो पाहून हार्दिक पुन्हा एकदा नताशावर फिदा झाला आहे. नताशाच्या या फोटोवर प्रेम दर्शविणारे एक हार्ट इमोजी त्याने पोस्ट केले आहे.

नताशाचा नवा लूक पाहून हार्दिक खूपच घायाळ झाला आहे. फक्त हार्दिकच नाही तर नताशाचे चाहते सुद्धा तिच्या लूकवर घायाळ झाले आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोला ‘क्यूटनेस ओव्हरलोडेड’ अशी कमेंट केली आहे. अन्य चाहत्यांनी तिला ब्यूटिफुल, हॉट अशा कमेंट दिल्या आहेत. नताशा एक सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे. तिला डिजे वाले बाबू या गाण्यामधून प्रसिद्धी मिळाली.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या चित्रपटात नताशा आयमट सॉंग करताना दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘झिरो’ या चित्रपटातही तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यापूर्वी ‘सत्याग्रह’, ‘फुकरे रिर्टन’, ‘डॅडी’ या चित्रपटात तिने आयटम नंबर केले होते. त्याचबरोबर ती नच बलिए आणि बिग बॉसच्या 8 व्या सीजनमध्येही सहभागी झाली होती. नताशा रिअल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंच तिच्या बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.