Natasha Noel : जगातील सर्वात हॉट योगा ट्रेनर, मुंबईच्या ‘या’ मुलीसाठी प्रत्येकजण आहे वेडा, पहा व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नताशा नोएलच्या योगाने हजारो लोक मोटिव्हेट होत आहेत. इतर सामान्य किंवा फेमस योगा ट्रेनर्सपेक्षा तिच्यात जे वेगळेपण आहे, ते म्हणजे पब्लिक प्लेसेसवर न लाजता योगा करणे. मुंबईत राहणारी 26 वर्षांची नताशा नोएल अजब योगासाठी ओळखली जाते. कधी ती न्यूड योगा करते तर कधी बिकनीमध्ये. तिचे फोटो तुम्हाला हैराण करतील.

योगावर नताशाचा असा अभ्यास आहे की, ती हवे त्या ठिकाणी शरीर वाकवू शकते. नताशा नोएलची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे ती अतिशय कमी जागेत सुद्धा योगा करते. खिडकीतील अतिशय कमी जागा असो की, ड्रॉइंग रूमचा सोफा असो. इतकेच नव्हे, ती रेल्वे ट्रॅक, रस्ता, ट्रेन, डोंगर, मेट्रो अशा सार्वजनिक ठिकाणीसुद्धा योगा करते.

नताशाचे इंस्टाग्राम अकाऊंट योगाच्या विविध पोझ आणि व्हिडिओने भरलेले आहे. ती स्वता योगासाठी वेडी आहे आणि योगाबाबत लोकांमध्ये जागृतता निर्माण करते. योगासन करण्यास असमर्थ लोकांना ती टिप्स देते. तिच्या अनेक पोस्ट खुप वायरल होतात.

नताशाने खुप कमी वेळात नाव कमावले आहे. ती स्वताला फिट ठेवण्यासाठी खुप मेहनत करते. ती खुप पॉझिटिव्ह राहाते, तसेच इतरांनाही सल्ला देते.

नताशा एक डान्सर आणि सर्टिफाइड योगा ट्रेनर आहे. ती मुंबईत राहाते. तिने सोफिया कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. आपल्या टोंड बॉडीमुळे ती अशाप्रकारच्या योगा पोझ करू शकते.

नताशा काही महिन्यातच अशा योगा पोझ शिकली आहे, ज्या करणे मोठ-मोठ्यांसाठी शक्य नाही. नताशानुसार, जेव्हा तिची इच्छा होते, ती योगा करते. मग ती विमानात प्रवासात असो की, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये करत असो.