‘गोडसे’ हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी’ : कमल हसन

चेन्नई : वृत्तसंस्था – लोकसभेच्या तोंडावर राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत त्यात अभिनेतेही कमी नाहीत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मियाम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असं वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केलं आहे.

चेन्नईतील अर्वाकुरची येथे पोटनिवडणूक होणार आहे तिथल्या एका प्रचार सभेत कमल हसन बोलत होते ‘स्वतंत्र भारतात पहिला दहशतवादी हिंदू. त्याचं नाव नथुराम गोडसे.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्यचळवळीच नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसे याने केला आहे. त्यामुळे गोडसे याच्यावर सातत्याने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी, असा आरोप करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनीही ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. यात ते म्हणतात, ‘माझ्या एका मित्राने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण अशा प्रश्न विचारला ? त्यावर माझं उत्तर आहे गोडसे.’

Loading...
You might also like