‘नथुरामाच्या वारसांनी आम्हांला शिकवण्याची गरज नाही’ : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनमोहन सिंग सरकारनेच पकडलेल्या मसूद अझहरला सोडण्याच काम भाजप सरकारने केले. त्याच मसूद अझहर ने पुलवामा घडवले असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले. या पापाची जबाबदारी घेणार का असा सवाल त्यांनी विचारला आहे. इतकेच नाही तर, नथुरामाच्या वारसांनी आम्हांला शिकवण्याची गरज नाही असे म्हणत भाजपा आणि मोदी सरकारवर बोचरी टीकाही केली आहे. भाजपाच्या एका ट्विटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “कसाबला आणि अफझल गुरुला फाशी मनमोहन सिंग सरकारने दिली. मात्र मनमोहन सिंग सरकारनेच पकडलेल्या मसूद अझहरला सोडण्याच काम भाजप सरकारने केले. त्याच मसूद अझहर ने पुलवामा घडवले. या पापाची जबाबदारी घेणार का ? नथुरामाच्या वारसांनी आम्हांला शिकवण्याची गरज नाही.” असे खोचक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

दरम्यान दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले होते. त्यावर भाजपाने उत्तर दिले होते. याच उत्तराला धरून आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. दरम्यान भाजपाच्या ज्या ट्विटला आव्हाड यांनी उत्तर दिले त्या ट्विटमध्ये भाजपाने आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “मतांच्या राजकारणासाठी जे दहशतवाद्यांना मदतीचा हात देतात त्यांना माणुसकी म्हणजे काय हे माहिती तरी असते का?” याच मुद्द्याला धरून आव्हाड यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.

You might also like