देशात 1991 पासुन आत्तापर्यंत 16 दोषींना देण्यात आलीय ‘फाशी’, याकूब मेमन होता शेवटचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मागील तीन दशकात गुन्हेगारांना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षांचा इतिहास पाहिला तर 1991 पासून 16 दोषांना फाशीवर चढवण्यात आले आहे. यात 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या धनंजय चटर्जीपासून याकूब मेमन आणि अफजल गुरुचा समावेश आहे. देशाच्या मागील 20 वर्षाच्या इतिहासावर नजर टाकली तर या दोन दशकात 4 दोषांना फासावर देण्यात आले. यात एका बलात्कारातील दोषी होता तर चार दहशतवादी.

धनंजय चटर्जीला 14 ऑगस्ट 2001 साली अलीपूर तुरुंग कोलकतामध्ये फासावर चढवण्यात आले. त्याला ही शिक्षा सुनावता-सुनावता 14 वर्ष लागली. 5 मार्च 1990 मध्ये त्याच्यावर 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप होता. त्यानंतर मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला 21 नोव्हेंबर 2012 साली पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर चढवले. 26 नोव्हेंबर 2008 साली त्याने मुंबईत ताज हाॅटेलवर दहशतवादी हल्ला करुन अनेक निरापराधांचे जीव घेतले होते. कसाब पाकिस्तानी होता. त्याला फासावर चढवण्यासाठी जवळपास 4 वर्षांचा कालावधी लागला.

त्यानंतर भारतीय संसदेवर हल्ला करणारा आरोपी अफजल गुरुला फासावर देण्यात आले. 13 डिसेंबर 2001 साली भारताच्या संसदेवर त्याने हल्ला केला होता. अफजल गुरुला फासापर्यंत नेण्यासाठी जवळपास 11 वर्ष इतका वेळ लागला. 9 फेब्रुवारी 2013 साली अफजल गुरुला तिहार तुरुंगात फासावर चढवले.

अफजल गुरुनंतर 30 जुलै 2015 ला नागपूर सेंट्रल जेलमध्ये याकूब मेमनला फासावर देण्यात आले होते. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील तो आरोपी होता. याकूबला फासावर देण्यासाठी 22 वर्षांचा कालावधी लागला.

अफजल गुरुनंतर आता दुसरे प्रकरण आहे ते तिहार तुरुंगात बंद असलेले निर्भया हत्याकांडातील चार आरोपी ज्यांना मंगळवारी 7 जानेवारीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तिहार आणि इतर तुरुंगातील इतिहासात ही पहिलीच वेळ असेल ती एकसाथ 4 दोषींना फासावर देण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/