काय सांगता ! होय, फ्लिपकार्टची ऑर्डर कॅन्सल करून ‘लखपती’ बनले 22 लोक, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत ऑनलाइन फसवणूकीची प्रकरणं समोर येत होती, परंतु मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात नवे प्रकरणं समोर आले. यात खात्यातून पैसे काढण्यात आलेले नाहीत, तर जास्त पैसे परत जमा झाले. ई – कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टची ऑर्डर रद्द केल्यावर बँकेने 22 खात्यांत अनेकदा रक्कम परत केली. या चुकीमुळे 1 कोटी रुपये 22 खात्यात जमा झाले. काही खातेदारांनी तर हे पैसे वापरले सुद्धा. आता बँक पैसे वसुल करण्यात व्यस्त आहे. हे प्रकरण उमरिया पिनौराच्या सेंट्रल बँकमधील आहे.

या बँकेत महुराचे रहिवासी असलेल्या 22 लोकांच्या खात्यात फ्लिपकार्ट द्वारे परत करण्यात आलेली रक्कम एकदा नाही तर अनेकदा जमा केली. आता बँक अधिकारी पैसे वसुल करण्यासाठी खातेदारांच्या घरी चकरा मारत आहेत. सर्व 22 लोकांनी पाठवण्यात आलेल्या वस्तू आवडल्या नाहीत, त्यांनी फ्लिपकार्टला पैसे परत देण्याची विनंती केली. फ्लिपकार्टने जेव्हा या खातेदारांनी पैसे परत केले तेव्हा 22 खातेदारांच्या खात्यात अनेकदा पैसे परत देण्यात आले. अशा प्रकारे तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम 22 खात्यात जमा करण्यात आली. या खातेदारांनी 1 लाख रुपयांची खरेदीची ऑर्डर रद्द केली होती.

हे प्रकरण जानेवारीत समोर आले, बँक अधिकाऱ्यांनी या सर्व खातेदारांकडून गुपचूप रिकव्हरी केली. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत 40 लाख रुपये वसूल केले आहेत. बाकी 60 लाख रुपये अद्याप परत आलेले नाही.

जेव्हा लोकांच्या खात्यात 20 ते 25 लाख रुपये जमा झाले तेव्हा काही लोकांनी ही रक्कम काढून त्याचा उपयोग केला काहींनी मोबाइल, वाहन खरेदी केले. तर काहींनी ही रक्कम काढून त्याचे एफडी केले. प्रकरणाच्या चौकशीसाठी सेंट्रल बँकेच्या मुंबई ऑफिसची एक टीम दाखल होणार आहे.

रक्कमेची रिकव्हरी होत आहे –
तांत्रिक चुकीमुळे जास्त वेळा रुपये बँक ग्राहकांच्या खात्यात केले. हे सेंट्रल बँकेच्या ऑफिसकडून चुकून झाले आहे. रक्कमेची रिकव्हरी केली जात आहे. सध्या चौकशी सुरु आहे अशी माहिती सेंट्रल बँक पिनौराचे प्रबंधक सोरंजन बहारा यांनी दिली.