तबलीगी जमातशी संबंधित 22 हजार लोक संशयित, सर्वांना केले क्वारंटाईन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीगी जमात मरकझमधील कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधित तब्बल 22 हजार जणांना देशभरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तबलीगींसंबंधी 17 राज्यांमध्ये कोरोनाचे 1023 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील एकूण रुग्णांपैकी 30 टक्के आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन अजूनही लक्ष ठेवू आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच तबलीगी जमातमधील लोक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची ओळख पटविण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

मरकजला थांबवता आलेनसल्याने कोरोनाच्या लढ्याला बसला मोठा धक्का

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत देशातील राजधानीत तबलीगी जमातला थांबवू शकलो नसल्याने हा मोठा धक्का असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशात आतापर्यंत कोरोनाचे जेवढे रूग्ण सापडले आहेत, त्यापैकी 30 टक्के रुग्ण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. आम्ही हा धोका समजावून घेण्यात आणि रोखण्यात अपयशी ठरल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

तबलीगीसंबंधी देशांत करोनाचे 1023 रुग्ण

देशात आतापर्यंत 2902 कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. त्यापैकी 1023 रुग्ण हे तबलिगी जमातशी संबंधीत आहेत. शुक्रवारी लव अग्रवाल यांनी ही संख्या 647 सांगितली होती. एका दिवसात तबलिगी जमातशी संबंधीत 376 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.