अभिमानास्पद ! १० वर्षात भारतानं १०१ देशांना ‘धोबीपछाड’ देत मिळवलं ‘अव्वल’ स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक (एमपीआय) २०१९ च्या अहवालात जाहीर करण्यात करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील दहा वर्षात भारताने देशातील २७ कोटी नागरिकांना गरिबीतून वर आणले आहे. सर्वात जास्त लोकसंख्येला गरिबीतून वर आणणाऱ्या १०१ देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले असून २००६ ते २०१६ या काळात स्वयंपाकाचे इंधन, स्वच्छता आणि पोषण क्षेत्रात सुधारणेबरोबरच विभिन्न स्तरांवर सर्वात वेगाने गरिबी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

अहवालानुसार, गरिबांची संख्या ६४ कोटी होती, जी आता ३६.९० कोटींवर आली आहे. त्यामुळे पूर्वी असणारी ५५ टक्के गरिबांची संख्या आता जवळपास २७ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. या अहवालानुसार गरिबी म्हणजे फक्त पैशाने गरीब नाही तर ज्याचे स्वास्थ चांगले नाही त्याला देखील या मानकानुसार गरीब ठरवण्यात येते. त्याचबरोबर ज्यांना युद्धजन्य परिस्थितीत राहावे लागते किंवा जे काम करू शकत नाहीत, अशा व्यक्तींचा समावेश देखील गरिब व्यक्तींमध्ये करण्यात येतो. त्याचबरोबर या अहवालात सांगण्यात आले कि, शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी त्याचप्रमाणे साफसफाई न करणे यांसारख्या कारणांमुळे देखील माणसाच्या जीवनात गरिबी येते.

या प्रमुख मुद्द्यांच्या आधारे मोजणी
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांकात काही मुद्द्यांचा विचार आणि अभ्यास करून हा अहवाल बनवला जातो. यामध्ये प्रामुख्याने संपत्ती, स्वयंपाकाचे इंधन, स्वच्छता आणि पोषण यांचा समावेश असतो. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक जीवनाच्या स्तराचा देखील समावेश असतो.

या दहा देशांचा केला अभ्यास
बांगलादेश, कंबोडिया, इथोपिया, हैती, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, पेरू, व्हिएतनाम आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे.

दरम्यान, या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार दक्षिण आशियामध्ये सर्वात जास्त प्रगती करण्यात आली आहे. भारतात २००६ ते २०१६ च्या दरम्यान २७.१० कोटी नागरिक, तर बांगलादेशात २००४ ते २०१४ पर्यंत एक कोटी ९० लाख लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. भारत आणि कंबोडियाने यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय