‘लॉकडाऊन’मुळं जगभरात 40000 भारतीय नावीक जहाजांमध्ये अकडले, सरकारने दिला ‘हा’ विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप मायदेशात आणण्यासाठी सरकारकडून योग्य ती उपाय योजना केली जात आहे. तसेच अजूनही काही नागरिक इतर देशांमध्ये अडकले असून त्यांना भारतात आणण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. विदेशात अडकलेले भारतीय नागरिक आपल्या मायदेशात येण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जगभरातील भारतीय समुद्री जहाज, चालक वेगेवळ्या ठिकाणी जहाजांवर अडकले आहेत.

जहाजांवर अडकलेला प्रत्येकजण मायदेशात परतण्याची वाट पहात आहे. तर सरकारने लॉकडाऊन हटवल्यानंतर त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. समुद्री सेवांशी संबंधित असलेल्या नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया आणि मेरीटाईम असोसोसिएशन ऑफ शिपोव्हनर्स, शिपमॅनेजर्स आणि एजंट्स या सागरी संघटनांच्या माहितीनुसार, समुद्रामध्ये 15 हजार मालवाहू जहाजे सध्या अडकले आहेत. तसेच प्रवासी जहाजांवर 25 हजार प्रवासी अडकले असल्याची नोंद संघटनांकडे आहे. संघटनांनी जहाज वाहतूक मंत्रालयाकडे याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे.

नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन शिव हलबे म्हणाले, जगभरात सुमारे 40 हजार भारतीय समुद्री मालवाहू जहाज आणि प्रवासी जहाजांवर अडकल्याचा अंदाज आहे. ते सर्व आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी उत्सूक झाले आहेत. त्यांचा रोजगाराचा करार देखील संपला आहे. यावर जहाज वाहतूक मंत्री मनसुख लाल मंडावीया यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वांना सुरक्षित परत आणले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, या सर्व खलाशांची प्रथम तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना काही दिवस पूर्णपणे क्वारंटाईमध्ये ठेण्यात येईल असेही केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. या संघटनांच्या प्रतिनिधींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री मंडावीया यांच्याशी बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री म्हणाले की, या खलाशांना अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची आणि बंदरांवर सहज सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

You might also like