कोण होते ACP अनिल कोहली ? जे ‘कोरोना’शी लढता-लढता झाले शहीद, नशिबानं साथ दिली असती तर…

पंजाब : वृत्तसंस्था – पंजाबमधील लुधियाना येथील सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) अनिल कोहली हे आज कोरोनाच्या युद्धात शहीद झाले. चार दिवस कोरोनावर मात दिल्यावर पाचव्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. ते लुधियानाच्या एसपीएस रुग्णालयात भरती होते आणि व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्लाझ्मा थेरपीसाठी तयारी सुरू होती, प्लाझ्मा थेरपी मशीन चंदीगड पीजीआयहून लुधियानाला पोहोचली देखील होती, त्या अगोदरच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. एसीपी अनिल कुमार कोहली यांना लुधियाना सब्जी मंडी येथे ड्युटी करताना कोविड-१९ ने संक्रमित झाल्याची पुष्टी १३ एप्रिल रोजी झाली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांना लुधियानाच्या सतगुरु प्रताप सिंह रुग्णालयात (एसपीएस हॉस्पिटल) दाखल केले होते.

एसीपी कोहली मूळ खन्ना येथील राहणारे होते
एसीपी कोहली ५२ वर्षांचे होते. ते मूळचे खन्नाचे राहणारे होते. लुधियाना येथे पोस्टिंग केल्यानंतर ते जवळजवळ पाच महिने पत्नी व तरुण मुलासह तेथे शिफ्ट झाले होते. एसीपी कोहली यांचा मोठा मुलगा कॅनडामध्ये राहतो.

एसीपी कोहली हे लुधियानामधील पहिले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते
कोहली लुधियानामधील पहिले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. १३ पूर्वीच एकदा प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना एसपीएस रुग्णालयात दाखल केले होते, जेथे कोरोनाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. यामुळे त्यांना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून सोडले होते. नंतर प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच त्यांना १३ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. प्रकृती अधिकच खराब झाल्याने त्याला व्हेंटिलेटर ठेवले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी ढासळत होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

‘प्लाझ्मा ट्रीटमेंट’ साठी लुधियानाला पोहोचली होती टीम
लुधियानाचे एसीपी अनिल कोहली प्लाझ्मा थेरपी घेण्याची तयारी करत होते. पंजाबमधील ही पहिलीच घटना असती ज्यात थेरपी केली जाणार होती. एसीपीच्या कुटुंबीयांनीही या थेरपीला परवानगी दिली होती. सरकार द्वारे कोविड-१९ रूग्णांवर ‘प्लाज्मा ट्रीटमेंट’ करण्याच्या निर्णयानंतर लुधियानाच्या रुग्णालयात एसीपी कोहलींचे उपचार होणार होते. या थेरपीचे व्यवस्थापन राज्य सरकारचे आरोग्य सल्लागार आणि पीजीआयचे माजी संचालक डॉ. केके तलवाड करत होते. डॉ. तलवाड यांच्या आदेशानुसार, पीजीआयच्या रक्त संक्रमण विभागाचे माजी प्रमुख डॉ. नीलम मारवाह यांनी प्लाझ्मा थेरपीसाठी पुढाकार घेण्यास सहमती दर्शवली होती. टीम चंदीगड पीजीआयमधून लुधियानाला पोहोचली होती, पण त्यांचे नशीब काही वेगळे होते.

एसीपीची पत्नी, ड्रायव्हर आणि एचएसओ पॉजिटीव्ह, मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह
एसीपीशी थेट संपर्क साधलेल्या ३० जणांचा अहवाल आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवला होता. त्यापैकी १३ जणांचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये ४ पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर एसीपीच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याची पुष्टी सिव्हील सर्जन डॉ. राजेश बग्गा यांनी केली. यापूर्वी बुधवारी एसीपीची बहीण, भाचा आणि भाची यांचे अहवालही नकारात्मक आले आहेत. एसीपी पॉझिटिव्ह आढळल्याने या सर्वांना क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. उपनिरीक्षक लुधियानाचे रहिवासी असून पोलिस स्टेशनचे प्रभारी आहेत.

त्यांच्या कुटुंबातील सदस्य, आई-वडील, भाऊ आणि वहिनी यांचीही आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे एसीपीचा गनमॅन फिरोजपूरच्या गावातील रहिवासी असून त्याच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि दीड वर्षाचा मुलगा आहे. गनमॅनला फिरोजपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. हे दोन्ही पोलिस कर्मचारी जवान आहेत ही दिलासा देणारी बाब आहे. त्यांच्यावर व्हायरसचा हल्ला होणार नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. पण त्यांच्यामुळे आजारी किंवा वृद्ध व्यक्तीला संक्रमण होऊन नुकसान पोहोचवू शकतात.

२८ मार्चला झाली होती बैठक
एसीपी पोलिस आणि नागरी प्रशासनाच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. २८ मार्च रोजी त्यांनी सब्जी मंडी येथे कारागीरांशी बैठक घेतली होती आणि जिल्हा मंडी अधिकारी यांनी मास्क देखील लावले नव्हते. आता प्रशासनात अशी भीती पसरली आहे कि त्यांच्या संपर्कात असलेले काही लोक कोरोनामुळे पॉजिटीव्ह तर नाहीत.