‘ब्लॅक फंगस’च्या आव्हानादरम्यान मुलांमध्ये ’मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’चा धोका, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

बेंगळुरु : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रूग्णांना होणार्‍या ब्लॅक फंगसचे आव्हान समोर आलेले असतानाच आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आता मुलांमध्ये ’मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ (एमआयएस-सी) नवीन चिंतेचे कारण बनला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या सिंड्रोममुळे मुलांचे अनेक अवयव प्रभावित होत आहेत. हा सिंड्रोम सामान्यपणे कोरोना संसर्गाच्या अनेक आठवड्यानंतर दिसून आला आहे. कोरोनातून बरे झालेल्या मुलांना या सिंड्रोमने संक्रमित होण्याचा धोका आहे.

फोर्टिस हेल्थकेयरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी म्हटले की, मी सांगू शकत नाही की हे धोकादायक आहे किंवा याच्यामुळे जीवाला धोका आहे. परंतु यामध्ये कोणतेही दुमत नाही की, अनेकदा हा संसर्ग मुलांना वाईट प्रकारे प्रभावित करतो. हा मुलांचे हृदय, यकृत आणि मुत्रपिंडाला वाईट प्रकारे प्रभावित करतो. हा संसर्ग कोरोना झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यानंतर होतो. ’मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ (एमआयएस-सी) कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात तयार झालेल्या अँटीजनच्या प्रतिक्रियेचा परिणाम आहे.

डॉ. योगेश कुमार यांचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्ग असा आजार आहे ज्याच्या बाबत काहीही ठोसपणे सांगता येत नाही. बहुतांश प्रकरणात हा संसर्ग किंचित किंवा हलका असतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर मुलांमध्ये अँटीबॉडी निर्माण होते. ही अँटीबॉडी मुलांच्या शरीरात प्रतिक्रिया करते. यामुळे शरीरात अ‍ॅलर्जी किंवा दुसरे संसर्ग होऊ लागतात. ’मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ (एमआयएस-सी) मुलांचे हृदय, लीव्हर आणि किडनीसारख्या अवयवांना प्रभावित करते. हे सर्व आजार कोरोनातून बरे झाल्यानंतर होण्याची शक्यता असते.

डॉ. योगेश कुमार यांच्यानुसार, मागील वर्षी फोर्टिस हेल्थकेयरमध्ये अशा तीन केस आल्या होत्या. तर दुसर्‍या लाटेत दोन प्रकरणे आली होती. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियामध्ये महामारी तज्ज्ञ आणि राज्य कोविड-19 तंत्रज्ञान सल्लागार समितीचे सदस्य डॉ. गिरीधर आर. बाबू यांनी म्हटले की, ’मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ (एमआयएस-सी) च्या अभ्यासाच्या महत्वाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. या सिंड्रोमच्या सखोल अभ्यासाची गरज आहे.