Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली अंदमान आणि निकोबार बेटे, 4.1 नोंदली गेली तीव्रता

पोर्ट ब्लेयर : वृत्तसंस्था –   अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये सोमवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.1 नोंदली गेली. भूकंपाचे केंद्र कँपबेल बे च्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी 21 मार्चला नागालँडच्या मोकोकचुंगमध्ये भूकंपाचे झटके जाणवले होते. येथे भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 होती. भूकंपाचे केंद्र मोकोचुंगच्या पूर्वेला 77 किमी अंतरावर होते. याच महिन्यात 6 मार्चला लडाखमध्ये सुद्धा भूकंपाचे झटके जाणवले होते. येथे भूकंपाची तीव्रता 3.6 नोंदली गेली होती.

जाणून घ्या कोणता भूकंप जास्त धोकादायक

रिश्टर स्केलवर सामान्यपणे 5 पर्यंत तीव्रता असलेले भूकंप धोकादायक नसतात, परंतु हे प्रदेशाच्या संरचनेवर सुद्धा अवलंबून आहे. जर भूकंपाचे केंद्र नदीच्या किनार्‍यावर असेल आणि तिथे भूकंपरोधक तंत्रज्ञानाशिवाय उंच इमारती असतील तर 5 तीव्रतेचा भूकंपसुद्धा भयंकर ठरू शकतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा यापेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप असेल तर जवळपासच्या 40 किमीच्या कक्षेत धक्के तीव्र असतात. परंतु हे यावर सुद्धा अवलंबून आहे की भूकंपीय आवृत्ती वरच्या दिशेने आहे की कक्षेत आहे. जर कंपनाची आवृत्ती वरच्या दिशेने असेल तर कमी क्षेत्र प्रभावित होते.

भूकंपापासून असा करा बचाव

– आपले डोके एखाद्या वस्तून झाकून घ्या. काहीच नसेल तर आपल्या हातांनी डोके झाका. जेणेकरून गंभीर दुखापत होऊ नये.

– खालच्या फ्लोअरवर असाल तर डोके झाकून बाहेर मैदानात या.

–  जर उंच इमारतीमध्ये असाल तर सुरक्षित ठिकाणी जसे की, कोपरा, चौकट, किंवा मजबूत टेबल किंवा फळीच्या खाली पोहचा आणि धक्के थांबण्याची वाट पहा.

– जिन्यावरून खाली या आणि उघड्या मैदानाकडे जा.