COVID-19 : तुम्हाला मंजुर आहे काय WHO च्या प्रमुखांनी दिलेलं आरोग्याबाबतचं ‘आव्हान’, करू शकाल, एवढा ‘विश्वास’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे होणारे नुकसान जगाने कधी पाहिले नव्हते. आतापर्यंत संपूर्ण जग त्यासमोर असहाय्य दिसत आहे. यानंतरही या लढाईत हार मानायला तयार नाही. हे धैर्य आणि हाच विश्वास कोणत्याही युद्धावर विजय मिळवण्यात सर्वात महत्वाची भूमिका निभावतो.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला खूप काळ मागे खेचले असून संपूर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. रस्ते, बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, कार्यालये सर्व काही सुन्न आहे. प्रत्येक जण घरी राहण्यास भाग आहे. पण ही आता मजबूरी झाली आहे. ही एकमेव गोष्ट आहे जी जगाला शतकाच्या या सर्वात मोठ्या संकटापासून वाचवू शकते.

यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख स्वत: डॉक्टर टेड्रॉस अधनॉम गेब्रेयेसस यांनी संपूर्ण जगाला एक चॅलेंज दिले असून त्याचे नाव आहे #HEALTHYATHOMECHALLENGE. डब्ल्यूएचओने केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लोकांना विचारले आहे की ते त्यांचे चॅलेंज स्वीकारण्यास तयार आहेत का? यात सांगितले आहे कि घरात स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी ते काय करत आहेत.

एवढेच नव्हे तर या ट्विटमध्ये डब्ल्यूएचने काही आयडियाही शेअर केल्या आहेत. ट्विटसह प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की बहुतेक लोक हा व्हिडिओ त्यांच्या घरात बसून करत आहेत. यात डॉक्टर टेड्रॉस स्वत: लोकांना काही टिप्स देत असून त्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत

  • आपल्या आरोग्याची आणि आपल्या जवळच्या लोकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. 
  • घरात राहत असला तरी स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खूप काही करू शकता. 
  • निरोगी राहण्यासाठी खूप हेल्दी खा. 
  • असे ड्रिंक्स ज्यात साखर असते, ते टाळा. 
  • धूम्रपान टाळा आणि स्वतःला ऍक्टिव्ह ठेवा. 
  • जर तुम्ही बाहेर जाऊ शकत असाल तर थोडाच वेळ बाहेर फिरा. 
  • घरात बसून योगा करा. ज्या लोकांना याबाबत माहिती नाही ते ऑनलाइन योगा शिकू शकतात. 
  • जास्त वेळ एकाच पोझिशन मध्ये बसून काम करू नका.  
  • कमीत कमी तीन मिनीटांच्या वर खाली बसून व्यायाम करा. हा व्यायाम दिवसात वारंवार केला जाऊ शकतो. 
  • आपल्या मानसिक आरोग्याकडे देखील पूर्ण लक्ष द्या. 
  • गाणी ऐका, पुस्तक वाचा आणि घरात गेम्स खेळा.