स्वत:ला ‘नास्तिक’ समजणार्‍या कॉम्रेडांनी बदलले कपडे, आता ‘आस्तिक’ बनण्याच्या मार्गावर, जाणार देवाच्या आश्रयाला

कोलकाता : वृत्त संस्था – हे कालचक्र आहे. लाल सलाम करून स्वत:ला नास्तिक समजाणारे बंगालचे माकपा नेते जे मंदिरात जाणार्‍या आपल्याच सहकार्‍यांना सुनावत होते, त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करत होते, ते आता देवाच्या आश्रयाला जाण्याबाबत बोलत आहेत. जेव्हा माकपा नेते सुभाष चक्रवर्ती बंगालचे परिवहन मंत्री होते तेव्हा वीरभूम जिल्ह्यातील मां काली तारा मां (तारापीठ) च्या मंदिरात गेले होते, तेव्हा माकपामध्ये मोठा गोंधळ उडाला होता. त्यांना याचे स्पष्टीकरण सुद्धा द्यावे लागले होते.

कॉम्रेडसुद्धा आस्तिक बनण्याच्या मार्गावर

आज सत्तेतून बाहेर पडल्यानंतर 9 वर्षांनी आता कॉम्रेडसुद्धा आस्तिक बनण्याच्या मार्गावर पुढे जाऊ लागले आहेत. असे म्हटले जात आहे की, धार्मिक कट्टरता आणि बदलेल्या राजकारणाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कॉम्रेड्स सुद्धा धार्मिकस्थळांना भेटी देऊ लागले आहेत.

धर्मस्थळांपासून दूर राहिल्याने पक्षाचे नुकसान

माकपाला आपल्या अंतर्गत समिक्षा अहवालवातून समजले की, नास्तिक असल्याने आणि धर्मस्थळांपासून दूर राहिल्याने पार्टीचे नुकसान होत आहे. याचा लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्यासारख्या इतर संघटना घेत आहेत. यासाठी आता धर्मनिरपेक्षतेच्या वाटेवर चालणारे कॉम्रेडसुद्धा मंदिर आणि अन्य धार्मिकस्थळांच्या व्यवस्थापनात आपली भूमिका बजावतील, जेणेकरून कट्टरपंथी शक्तींना दूर करता येईल. एवढेच नव्हे तर माकपा राजकीय विभागाचे सदस्यसुद्धा या मुद्द्यावर उघडपणे बोलत आहेत. काही नेते तर उघडपणे असे बोलत आहेत की देवाच्या दारात गेल्याने लोकांमध्ये अंतदृष्टी वाढेल, आणि हे पार्टीच्या विचारधारेच्या विरोधातही नाही.

पूजाअर्चा सर्व धर्मस्थळांवर होणार लागू

माकपा राजकीय विभागाचे मोहम्मद सलीम यांच्यासारखे सदस्यसुद्धा आता म्हणू लागले आहेत की, आम्ही थेटपणे कोणत्याही धार्मिक व्यवस्थेशी संबंधीत नव्हतो, परंतु समाज विभागणारी आणि हुकूमशाही शक्ती आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धर्मस्थळांचा वापर करत आहे. माकपाच्या कोणत्याही सदस्याला पूजा आणि मंदिर समितीमध्ये सहभागी होण्याची परवानगी नव्हती, परंतु आता या समित्यांमध्ये धर्मनिरपेक्ष लोकांची गरज दिसू लागली आहे. सलीम म्हणाले, आम्ही त्यांच्या (संघ) सारख्या संघटनांना सूट देऊ शकत नाही. हे एकतर्फी होऊ नये. याच कारणामुळे आम्ही केरळ आणि अन्य राज्यांमध्ये धर्मनिरपेक्ष सिद्धांतांना पूजाअर्चा होणार्‍या स्थळांवर प्रोत्साहन दिले आहे. हे केवळ मंदिरासाठीच नव्हे तर मशिद, गुरूद्वारा, चर्च आणि अन्य धार्मिकस्थळांबाबतही लागू होईल.

भाजपाशी लढण्यासाठी जरूरी

अनेक माकपा नेते मान्य करत आहेत की, भाजपा व अन्य संघटनांशी लढण्यासाठी हे जरूरी आहे. माकपा नेत्यांचे म्हणणे आहे की, आम्ही नास्तिक लोक आहोत, परंतु आम्ही कधी म्हटले नाही की, इतर लोकांनी आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेऊ नये. माकपा अनेक दशकांनंतर धार्मिकस्थळ आणि धार्मिक कार्यक्रमात पुस्तकांचे स्टॉल आणि मेडिकल कॅम्प लावत आली आहे. हे प्रथमच होत आहे, की पार्टी अन्य धार्मिक पक्षांना तोंड देण्यासाठी मंदिराच्या प्रांगणात कायमस्वरूपी पुस्तकांची दुकाने, मेडिकल सेंटर, पाण्याची सुविधा याबाबत बोलत आहे.