‘कळत नकळत’चे डायरेक्टर कांचन नायक यांचं 65 व्या वर्षी पुण्यात निधन !

पोलीसनामा ऑनलाइन – फेमस डायरेक्टर कांचन नायक यांचं पुण्यात निधन झालं आहे. 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वाते घेतला. सोमवारी (दि 15 जून 2020) पुण्यातील वैकुंठ स्माशनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कांचन नायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते डायरेक्टर होते.

कांचन यांनी दोन सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. एक आहे कळत नकळत. हा सिनेमा खूप गाजला आहे. 1989 साली आलेल्या सिनेमाची निर्मिती स्मिता तळवलकर आणि डायरेक्शन कांचन नायक यांनी केलं होतं. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा त्यांचा दुसरा सिनेमा आहे विश्वनाथ शिंपी.

कांचन नायक यांच्या कारकीर्दीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 4 दशकांपासून ते डायरेक्शन क्षेत्रात कार्यरथ आहेत. केवळ सिनेमाच नाही तर, मालिका आणि माहितीपटांचंही डायरेक्शन त्यांनी केलं आहे. नायक यांनी जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील यांच्यासोबत काम केलं आहे.