राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ 24 जानेवारीला होणार जगभरात ‘प्रदर्शित’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट येत्या 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ ची प्रस्तुती असलेला म्होरक्या भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अमर देवकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासह या चित्रपटातील कलाकार रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब अशी की या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही म्होरक्याने आपला ठसा उमटवला आहे.

mhorakiya

” ‘म्होरक्या’ ही फक्त परेड शिकणाऱ्या एका लहान मुलाची गोष्ट नाही तर खरे म्हणजे ही जगाची , इतिहासाची, आपल्या भोवतालातल्या प्रत्येकाची गोष्ट आहे.” अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली होती. समाजमाध्यमांवर चित्रपटाची प्रसिद्धी सुरु झाली असून, चित्रपटाचे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले आनंद शिंदेच्या आवाजातील ‘म्होरक्या’ गाणे चांगलेच गाजते आहे. यात पहिल्यांदाच आनंद शिंदेनी मराठीत रॅप गायले आहे.हा या चित्रपटाचा युएसपी (USP) म्हणता येईल.

या चित्रपटात रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे या बालकलाकारांसमवेत रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे, सुरेखा गव्हाणे आणि स्वतः लेखक दिग्दर्शक अमर देवकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील बहुतांशी कलाकारांना चित्रपटक्षेत्राचा अनुभव नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बार्शीसारख्या छोट्या शहरातील आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रपट चित्रित झालेला आहे.

गणतंत्र दिनाला शाळेत होणाऱ्या परेडचे नेतृत्व करण्यास मिळावे यासाठी संघर्ष करणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलाची कथा म्होरक्यामध्ये सांगितली आहे. या कथेतून लोकशाहीतील नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like