‘बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी गेंड्याची कातडी हवी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपटसृष्टीत टिकून राहाण्याविषयी अतिशय सूचक विधान राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज वाजपेयीनं केलं आहे. ‘इथं टिकायचं, तर गेंड्याची कातडी हवी’, असं विधान वाजपेयीनं केलं आहे. एका चर्चासत्रादरम्यान ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

एका चर्चासत्रात मनोज वाजपेयी यांना विचारण्यात आले की, चित्रपटसृष्टीत टिकून राहाण्यासाठी तुमचा मंत्र काय आहे ? यावर त्यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्याकडे काम नव्हते अशा दिवसांतील एक किस्सा सांगत मनोज वाजपेयीनं या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले की, “माझ्या एका मित्रानं मला त्याच्या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी बोलावले होते. त्या शोसाठी मीडिया, फोटोग्राफर सगळे उपस्थित होते. त्यांनी मला पाहिले आणि एक फोटोग्राफर पटकन म्हणाला, हा फार महत्त्वाचा अभिनेता नाही, त्याचे फोटो काढण्यात वेळ वाया नका घालवू.”

यश मिळालं की मित्रमैत्रिणी मिळतात आणि अपयशानं ते आपोआप दूर होतात असंही ते म्हणाले. शिवाय त्यांनी बॉलिवूडमधल्या खोटेपणाबद्दलची भावना व्यक्त केल्याचे दिसून आले. असं विधान करण्यामागची त्यांची भूमिका अद्याप समजली नाही. परंतु त्यांच्या विधानानंतर चर्चेला विधान आल्याचं दिसून आलं.