अयोध्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी नाही, सुप्रीम कोर्टानं सर्व 18 याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अयोद्या प्रकरणी दाखल 18 पुनर्विचार याचिका रद्द करण्यात आल्या. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज हा निर्णय देत सर्व 18 पुनर्विचार याचिका रद्द केल्या. म्हणजे आता अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला सुनावलेल्या निर्णयावर पुन्हा सुनावणी होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विचार याचिका रद्द करण्यात आल्यानंतर जमीयम उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी सांगितले की, आम्हाला याची खंत आहे की पुनर्विचार याचिका रद्द करण्यात आली. पहिल्यांदा मानन्यात आले होते की, मस्जिद आपल्या जागेवर बनली आहे, हे मान्य केले की ज्या लोकांनी मस्जिद पाडली ते गुन्हेगार होते, त्यानंतर त्या लोकांच्याच पक्षात निर्णय देण्यात आला. आम्हाला वाटत आहे की या निकालावर न्यायालयाने पुन्हा विचार करावा, यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/