महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 मुलांना ‘राष्ट्रीय बाल शक्ती’ पुरस्कार !

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनानिमित्त विशेष शौर्य गाजविणार्‍या १८ वर्षाखालील मुलांसाठी दिला जाणार्‍या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार (National Bal Shakti Award ) विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात सर्वाधिक ५ पुरस्कार महाराष्ट्रातील मुलांना जाहीर झाले आहेत. यंदा बाल शक्ती पुरस्काराच्या (National Bal Shakti Award ) विविध प्रकारांतर्गत देशभरातून ३२ मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (शौर्य पुरस्कार)
श्रीनाभ मौजेश अग्रवाल (नवनिर्माण पुरस्कार)
अर्चित राहुल पाटील (नवनिर्माण पुरस्कार)
सोनित सीसोलेकर (शैक्षणिक पुरस्कार)
काम्या कार्तिकेयन (क्राडा पुरस्कार)
या महाराष्ट्रातील ५ मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ३२ जिल्ह्यातील आहेत. कला व संस्कृती क्षेत्रात ७ पुरस्कार, नावीन्यपूर्णतेसाठी ९ तर, शैक्षणिक कामगिरीसाठी ५ पुरस्कार देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बाल पुरस्कार विजेत्यांशी आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी या उपस्थित राहणार आहेत.