गोमुखासन करा संधिवाताला पळवा, ‘या’ 5 गंभीर आजारावर ‘रामबाण’ उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बहुतांश हॉस्पिटल कोरोना रूग्णांसाठी राखीव आहेत आणि अन्य आजारांसाठी उपचारासाठीचा मार्ग केवळ टेलिफोनिक क्लिनिक आहे. अशावेळी काळजी घेणे हाच सर्वात चांगला उपाय आहे. योगासन हा आरोग्य चांगले राखण्याचा उत्तम मार्ग आहे. अंतरराष्ट्रीय योग सप्ताहनिमित्त जाणून घेवूयात गोमुखासनाचे फायदे…

काय आहे गोमुखासन?

‘गोमुख’ चा अर्थ गाईचा चेहरा किंवा मुख होय. या आसनात पायांची स्थिती बर्‍याच अंशी गोमुखासारखी होते. यामुळे या आसनाला गोमुखासन म्हणातात. हे महिलांसाठी अत्यंत लाभदायक आहे. सोबतच संधिवात, बद्धकोष्ठता, मधुमेह आणि कमरेच्या दुखण्यावर खुप परिणामकारक आहे.

हे आहेत फायदे

1 मधुमेह नियंत्रणात राहतो.
2 पाठ आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात.
3 स्त्री रोगांवर सर्वाधिक लाभदायक आहे.
4 फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते.
5 खांदे आखडणे आणि मानेचे दुखणे यावर गुणकारी आहे.
6 हे पाठीचा कणा सरळ ठेवण्यासह त्यास मजबूत सुद्धा करते.
7 हे नियमित केल्यास कमरेचे दुखणे दूर होते.

असे करा आसन

* पाय आणि हातांची स्थिती बदलून हे पुन्हा करायचे आहे.
* डावा पाय गुडघ्यातून दुमडून तसेच उजवीकडे जमीनीवर ठेवा.
* प्रथम दोन्ही पाय पुढच्या बाजूला पसरवा आणि हात बाजूला ठेवा.
* आता डोके कोपराच्या आधारावर शक्य तेवढे मागे नेण्याचा प्रयत्न करा.
* उजवा हात वर करा, कोपर्‍यातून दुमडा आणि वर घेऊन मागच्या बाजूला पाठीवर घेऊन जा.
* आता डावा हात उचला आणि तो कोपर्‍यातून दुमडा पुन्हा मागच्या बाजूला खांद्यांच खाली घेऊन जा.

हे लक्षात ठेवा
1 खांदे, पाठ, नितंब किंवा गुडघ्यांचे दुखणे असेल तर हे करू नका.
2 सुरूवातीला पाठीच्या मागे हात एकमेकांना पकडण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करू नका.
3 या आसनाने मांड्या, नितंब, पाठीचा वरचा भाग इत्यादी ठिकणचे स्नायू मजबूत होतात.
4 हे हदयरोगाच्या रूग्णांसाठी सुद्धा लाभदायक आहे.
5 दहा मिनिटे केल्यास थकवा, चिंता, मानेचे दुखणे दुर होते.