Corona Vaccine : Covaxin टोचल्यानंतर साईड इफेक्ट झाल्यास ‘भारत बायोटेक’ देणार नुकसान भरपाई, जाणून घ्या कशी ते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आजपासून कोरोना लसीकरणाचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, भारत बायोटेक कंपनीने आपली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन संदर्भात घोषणा केली की, या लसीचे काही साईड इफेक्ट जाणविल्यास लाभार्थ्यास भरपाई देण्यात येईल. इतकेच नाही तर कंपनीने हे आपल्या फॉर्ममध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. भारत बायोटेक या कंपनीला सरकारकडून कोविड – 19 लस कोवॅक्सीनचे 55 लाख डोस पुरवण्याचे आदेश मिळाले आहे. यादरम्यान, लसीच्या सुरक्षितेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासंदर्भात कंपनीने शुक्रवारी जारी केलेल्या संमतीपत्रात लिहिले की, लसीमुळे काही गंभीर दुष्परिणाम झाल्यास लाभार्थ्यास शासकीय मान्यताप्राप्त व अधिकृत रुग्णालयात आरोग्य सुविधा देण्यात येतील.

बीबीआयएलकडून देण्यात येईल भरपाई
लसीकरण केलेल्या लोकांच्या स्वाक्षर्‍या असलेल्या फॉर्मवर भारत बायोटेकने म्हटले की, “कोणताही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्यास आपणास शासकीय मान्यताप्राप्त आणि अधिकृत केंद्रे आणि रुग्णालयांत वैद्यकीयदृष्ट्या सुविधा प्रदान केली जाईल.” संमतीपत्रानुसार, जर लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्याचे सिद्ध झाले तर बीबीआयएलकडून भरपाई दिली जाईल. ” दरम्यान, कोवॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये, कोविड -19 विरुद्ध अँटीडॉस विकसित झाल्याची पुष्टी झाली. मात्र, कंपनीने अद्याप या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या नाहीत. लस उत्पादकाच्या मते, ही लस वैद्यकीयदृष्ट्या प्रभावी आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही आणि अद्याप त्याचा तिसरा टप्पा क्लिनिकल चाचणीत अभ्यास केला जात आहे. त्यात म्हटले आहे की, “हे जाणून घेणे आवश्यक आहे की लसीकरण म्हणजे असे नाही कि, कोविड – 19 संबंधित इतर खबरदारी घेतल्या जात नाहीत.”

फॉर्ममध्ये लिहावी लागतील लक्षणे
अहवालानुसार लस घेणाऱ्यास फॅक्टशीट आणि संबंधित परिणामाच्या माहितीसाठी एक फॉर्म दिला जाईल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्यास पहिल्या 7 दिवसात दिसणारी लक्षणे लिहावी लागतात.कन्सेंट फॉर्ममध्ये लिहिलेले आहे की, फेज – 1 आणि 2 मध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लसीने अँटीबॉडी तयार करण्याची क्षमता दर्शविली आहे. त्याच वेळी, अहवालात म्हटले आहे की फेज -3 ट्रायल सुरु असल्याने कोवॅक्सीनची अ‍ॅफिकसी निश्चित केली जाऊ शकत नाही. संमती पत्रात म्हटले की, लसीकरणानंतर होणाऱ्या खबरदारीचे पालन केले पाहिजे. फॉर्ममध्ये लसीकरण करणाऱ्यांच्या डेटाच्या प्रायव्हसीचेही संपूर्ण पालन करत वापरण्याची परवानगी मागितली आहे.

भरपाई देणे कंपनीची जबाबदारी – तज्ञ
या क्षेत्रातील तज्ञाच्या मते, ही लस अद्याप क्लिनिकल ट्रायल अवस्थेत असल्याने, एखाद्याचे गंभीर दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. दरम्यान, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा अल्ला यांनी ट्वीट केले की, “कोवॅक्सीन आणि भारत बायोटेक देश आणि कोरोना वॉरियर्सची सेवा करून सन्मान आणि कृतज्ञ आहेत.” भारतात लसीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी सरकार 3 लाख लोकांना लस देईल.