मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘सुमन’ योजनेतंर्गत गर्भवती महिलांचा संपुर्ण खर्च सरकार करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 100% सुरक्षित मातृत्वाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारने ‘सुमन’ (सुरक्षित मातृत्व आश्वासन) नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. रुग्णालय किंवा प्रशिक्षित परिचारिका यांच्या देखरेखीखाली देशात 100 टक्के प्रसूती करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. सध्या हा आकडा 80 टक्के आहे. त्यामुळे आता प्रसूतीदरम्यान उपचाराच्या अभावामुळे देशात कोणतीही आई किंवा मूल दगावणार नाही.

गर्भवती महिलेला सुरक्षित मातृत्वाची हमी –

आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन योजनेंतर्गत प्रत्येक गर्भवती महिला सुरक्षित मातृत्वाची हमी दिली जाईल. तसेच गर्भवती महिलेस प्रसूतीपूर्वी चार वेळा विनामूल्य तपासणी करण्याचा अधिकार असेल, ज्यामध्ये स्त्रीसह गर्भातील बाळाची आरोग्याची देखील माहिती मिळेल. एवढेच नव्हे तर प्रसूतीपूर्वी महिलेला रुग्णालयात आणण्यासाठी व नंतर घरी परत जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. टोल-फ्री नंबर 102 किंवा 108 वर कॉल करून गर्भवती महिलेला रुग्णलयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्यासाठी विनाशुल्क कॉल करू शकता.

सर्व खर्च सरकार उचलणार –

प्रसूतीदरम्यान होणारा सर्व खर्च सरकार ऑपरेशनपासूनच सरकार उचलणार आहे . प्रसुतिनंतर सहा महिन्यांसाठी ती आई व बाळाला मोफत औषधेही पुरवण्यात येणार असून नवजात मुलास कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासले असल्यास, त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल.

सर्व गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘सेवा हमीपत्र’ जाहीर केले आहे. सरकारने गर्भवती महिला दुर्गम भागात पोहोचण्यासाठी स्वयंसेवी गट, ग्रामस्तरीय आरोग्य व स्वच्छता समित्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांना सुविधांपासून वंचित राहावे लागणार नाही

रुग्णालयात 100% प्रसूती करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे कठीण नाही. आतापर्यंत 80 टक्के प्रसूती रुग्णालयांमध्ये केल्या जात आहेत. त्यातील 52 टक्के सरकारी रुग्णालयात होत आहेत. पैशाअभावी सुमन अभियान प्रसूतीच्या वेळी कोणत्याही महिलांना रुग्णालयाच्या सुविधा नाकारल्या जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करेल.

Visit : Policenama.com