भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी 20 वर्षानंतर केलं ‘अन्न ग्रहण’, जाणून घ्या काय होता ‘संकल्प’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी नुकतेच 20 वर्षानंतर अन्न ग्रहण केले. 20 वर्षापूर्वी महापौर बनल्यानंतर कैलास यांनी पितृ पर्वतावर बजरंगबली हनुमान यांची मूर्ती स्थापित करण्याचा संकल्प केला होता. मागील 20 वर्षांपासून अन्न त्यांच्या जेवणाचा भाग नव्हता. परंतु सांगितले जाते की त्यांनी हा संकल्प इंदौरच्या विकासासाठी केला होता.

कैलास विजयवर्गीय 2000 साली जेव्हा इंदौरचे महापौर होते तेव्हा त्यांनी एका संताने सांगितले होते की शहराला पितृ दोष आहे आणि यामुळे इंदौरचा विकास होत नाही. यावर उपाय म्हणून पितृ पर्वतावर श्री हनुमानाची मूर्ती स्थापित करुन दोष दूर केला जाऊ शकतो असे सांगितले होते.

72 फूट उंच, 108 टन वजन अशी आहे अष्टधातूची श्री हनुमानाची मूर्ती –
कैलास विजयवर्गीय यांनी संकल्प घेतला होता की जो पर्यंत ही मूर्ती स्थापन करणार नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही. आता 20 वर्षांनंतर त्यांचा हा संकल्प पूर्ण झाला. इंदौरच्या पितृ पर्वतावर 72 फूट उंच, 108 टन वजनाची अष्टधातू हनुमानाची मूर्ती त्यांनी स्थापित केली. यावर जवळपास 15 कोटी रुपये खर्च झाले.

प्रतिमेच्या प्राण प्रतिष्ठेनंतर केले अन्न ग्रहण –
श्री हनुमानाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर महामंडलेश्वर जूना अखाड्याचे पीठाधीश्वर अवधेशानंद गिरी जी महाराज, संत मुरारी बापू आणि वृंदावनचे महामंडलेश्वर गुरुशरणानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत कैलास विजयवर्गीय यांनी 20 वर्षानंतर संकल्प पूर्ण केल्यानंतर अन्न ग्रहण केले.

20 वर्ष त्यांच्या या संकल्पात त्यांच्या पत्नीने त्यांना पूर्ण सहकार्य केले आणि त्यांना फळ, साबुदाणे, वरईचा भात असे सर्वकाही योग्यवेळी दिले. एवढेच नाही तर 20 वर्षात विजयवर्गीय यांनी लोकांना आवाहन केले की आपल्या पूर्वजांच्या नावे पितृ पर्वतावर वृक्षारोपण करावे. यामुळे मागील दशकभरात या पर्वतावर 1 लाख पेक्षा जास्त वृक्षारोपण झाले, ज्यांचे आता मोठं मोठी झाडे झाली आहेत.

3 मार्चला मोठा भंडारा उत्सव –
कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय यांनी ट्विट केले की श्री पितरेश्वर हनुमान यांच्या इंदौर येण्याच्या आनंदात इंदौर वासियांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी उपस्थित रहावे. 3 मार्चला हा कार्यक्रम संपन्न होईल.