व्हॅक्सीन मिळताच भारावून गेले ब्राझीलचे राष्ट्रपती, हनुमानाचा फोटो ट्विट करून म्हणाले – ‘धन्यवाद भारत’

नवी दिल्ली : सौदी अरब, दक्षिण अफ्रीका, ब्राझील, मोरक्को, बांगलादेश आणि म्यानमारला करारानुसार कोविड-19 व्हॅक्सीनचा पुरवठा भारत करत आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सीरम इन्स्टीट्यूद्वारे बनवली जात असलेल्या ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या कोविशील्डचे (covishield vaccine ) 20 लाख डोस विमानाने शुक्रवारी मुंबई विमानतळावरून ब्राझीलसाठी रवाना झाले. कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताच्या योगदानावर ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो भावूक झाल्याचे दिसून आले. त्यांनी हनुमानाचा फोटोसह ट्विट करत भारताला धन्यवाद दिले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.

 

 

 

 

 

भारत एक महान भागीदार
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी शुक्रवारी म्हटले, नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी…जागतिक संकट दूर करण्याच्या प्रयत्नात भारत एक महान भागीदार असल्याने ब्राझील आज स्वताला अतिशय सन्मानित समजत आहे. ब्राझीलला कोविड व्हॅक्सीनची मदत करण्यासाठी आपणास खुप खुप धन्यवाद.

व्हॅक्सीन नव्हे, जशी संजीवनी बूटी मिळाली…
यासोबतच राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी हनुमानाचा एक फोटो सुद्धा ट्विट केला. ज्यामध्ये श्री हनुमान संजीवनी बूटी घेऊन जात आहेत. बोलसोनारो यांचे हे ट्विट पाहून हे समजू शकते की कोरोनाच्या संकटात सापडलेल्या ब्राझीलसाठी ही मदत किती महत्वाची आहे.

पीएम मोदींना केली होती मदतीची विनंती
जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीनच्या पुरवठ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी भारताला लवकरात लवकर व्हॅक्सीनचे 20 लाख डोस उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.