COVID-19 चा परिणाम : एअर इंडियानं 200 कर्मचाऱ्यांचा करार केला रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने गुरुवारी सुमारे 200 कर्मचाऱ्यांचा करार तात्पुरता संपुष्टात आणला आहे. यात एअर इंडियाच्या वैमानिकांचादेखील समावेश आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना म्हटले की, या यादीमध्ये तेच कर्मचारी आहेत, ज्यांना सेवानिवृत्तीनंतर संधी देण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे 14 एप्रिलपर्यंत बंद केली गेली आहेत.

लॉकडाऊनमुळे कंपनीच्या महसुलाला फटका
वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हंटले कि, ‘जवळपास सर्व विमाने ग्राऊंडेड असल्याने गेल्या आठवड्यात कंपनीच्या महसुलात मोठी घट झाली आहे. हे लक्षात घेता एअरलाइन्सने सेवानिवृत्तीनंतर पुन्हा एकदा संधी देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचे कंत्राट तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ तसेच , एअर इंडियाने यापूर्वी केबिन क्रूसह सर्व कर्मचार्‍यांना दिला जाणारा भत्ता 10% कमी केला आहे. या सरकारी विमान कंपनीने पुढील तीन महिन्यांत आपल्या कर्मचार्‍यांचा हा भत्ता कमी केला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे, ज्यामध्ये 14 एप्रिलपर्यंत सर्व अनावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अन्य क्षेत्रांसह विमान कंपन्यांवरही मोठा परिणाम झाला आहे.

देशातील कोरोना संक्रमणाची संख्या जवळपास 2 हजारांवर
गुरुवारीपर्यंत देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 1,965 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. यासह गुरुवारी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 50 पर्यंत वाढली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like