केरळमध्ये माजरांच्या मृत्यूमुळं प्रचंड खळबळ, सॅम्प्ल टेस्टिंगच्या नंतर झाली चिंता दूर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मनंतवाडी आणि मेपड्डी भागात अनेक मृत मांजरी आढळल्या आहेत. लोकांच्या एका गटाने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने नमुना घेऊन तपासणी केली. तपासात समोर आले कि, त्यांचा मृत्यू फिनलिन पार्वोव्हायरसमुळे झाला होता, जो लोकांमध्ये संसर्गजन्य नाही.

वायनाडचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. रामचंद्रन यांनी सांगितले की, पार्वोव्हायरस मांजरींना हानी पोहोचवू शकतो आणि त्यांच्या संरक्षणासाठी लसदेखील आहे. त्यांनी सांगितले कि, “मांजरींच्या मृत्यूमुळे येथील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि लोक घाबरले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

मृत मांजरींचे नमुने गोळा करून राज्य पशुसंवर्धन संस्थेला तपासणीसाठी देण्यात आले. त्याच्या तपासणीनंतर, हे निश्चित झाले की, पार्वोव्हायरसमुळे मांजरींचा मृत्यू झाला आहे. काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. हे मानवांमध्ये संक्रमित होत नाही. मेप्पडी येथे मांजरी पाळणाऱ्या एका महिलेने सांगितले की, दोन ते तीन दिवसांत 13 पेक्षा जास्त मांजरींचा मृत्यू झाला. या मांजरींच्या मृत्यूने कोरोना विषाणूच्या साथीच्या भीतीमुळे आम्हाला भीती वाटली. आम्ही आरोग्य व पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली. तेथून अधिकारी आले आणि त्यांनी तपासणीसाठी नमुने घेतले. ‘