‘ISRO’च्या ‘साहसी प्रयत्नाचा’ अनुभव भविष्यातील मोहिमांसाठी निश्चितच उपयोगी, ‘NASA’चे माजी अंतराळवीर जेरी लीनॅंगर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान -२ अयशस्वी ठरल्यानंतर सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. अशा वेळी मिशन अंतर्गत विक्रम लँडरच्या चंद्रच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्याच्या भारताच्या ‘साहसी प्रयत्नाचा’ अनुभव भविष्यातील मोहिमांसाठी निश्चितच उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन शनिवारी नासाचे माजी अंतराळवीर जेरी लीनॅंगर यांनी केले. १९८६ ते २००१ या काळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित रशियन अवकाश केंद्र मीर येथे लीनॅंगर पाच महिने राहिले होते. शुक्रवारी त्यांनी नेशनल जियोग्राफिक चॅनेलवर चंद्रयान २ च्या लँडिंगच्या थेट प्रक्षेपणात भाग घेतला.

लीनॅंगर पुढे म्हणाले,“याने आपण निराश होऊ नये, कारण भारत असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहे जे खूप कठीण आहे. लँडरशी संपर्क तुटण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची योजना आखली जात होती. तरीही दुर्दैवाने लँडर चंद्र पृष्ठभागापासून ४०० मीटर उंचीवर असलेल्या होव्हर पॉईंटवर पोहोचू शकला नाही.” ते म्हणाले, “जरी तो त्या टप्प्यावर पोहोचला असला आणि त्यानंतर अपयशी ठरला असला तरी त्याचा मोठा फायदा झाला असता कारण रडार अल्टिमेटर आणि लेसर चे प्रशिक्षण केले गेले असते, परंतु आपण मागे वळून पहाल आणि दूरदृष्टीने विचार कराल, तेव्हा हा प्रयत्न नक्कीच भविष्यातील मोहिमेसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे तुमच्या लक्षात येईल.

इस्रोचे अभिनंदन
जेरी लीनॅंगर म्हणाले की एक अंतराळवीर आणि तज्ञ म्हणून सांगतो की हे अभियान एक प्रचंड यश आहे. ते म्हणाले, “येत्या एक वर्षासाठी ऑर्बिटर मौल्यवान माहिती देत राहील. ऑर्बिटर येणारे सर्व संकेत सर्व यंत्रणा योग्यप्रकारे कार्यरत असल्याचे दर्शवित आहेत.” असे म्हणत त्यांनी या कठीण मोहिमेबद्दल इस्रोचे आणि भारताचे अभिनंदन केले.