Gayatri Mantra Helps to Control Blood Pressure : ‘गायत्री’ मंत्राचा जप उच्च रक्तदाब करतो ‘कंट्रोल’, ‘ही’ आहे योग्य प्रक्रिया, जाणून घ्या

जबलपुर : पोलीसनामा ऑनलाइन  –   रक्तदाब आणि हृदयाची वाढलेली गती, गायत्री मंत्राचा जप करून नियंत्रित करता येऊ शकते. मध्य प्रदेश मेडिकल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि हृदय रोगतज्ज्ञ डॉ. आर. एस. शर्मा यांनी आपल्या संशोधनात हे सिद्ध केल्याचा दावा केला आहे. कोरोना काळात सुद्धा हे खुप उपयोगी पडत आहे, कारण कोरोनाच्या भितीने अनेक लोकांमध्ये उच्च रक्तदाब, निद्रानाश आणि हृदयाचा वेग वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत.

यातील काही रूग्ण मंत्राच्या विज्ञान संमत पद्धतीद्वारे यावर नियंत्रण मिळवत आहेत. डॉ. शर्मा यांनी 1995 मध्ये गायत्री मंत्राचा उच्च रक्तदाब आणि हृदयाची गती वाढण्यावर प्रभावाबाबत संशोधन केले होते. हे संशोधन ’जर्नल्स ऑफ एपीआय’ मध्ये प्रकाशित झाले होते आणि गुवाहटीमध्ये एका नॅशनल कॉन्फरन्समध्ये यावर प्रेझंटेशन सुद्धा झाले होते.

अशाप्रकारे करा मंत्रजप

डॉ. शर्मा यांच्यानुसार, दिर्घ श्वास भरून नंतर हळुहळु सोडत ॐ शब्दाला लांबवत, याचा उच्चार जास्त वेळ करायचा आहे. यानंतर मंत्राचा उर्वरित भाग सामान्य श्वास घेत बोलायचा आहे. ही प्रक्रिया पुन्हा करायची आहे.

वैद्यकीय बाजू

गायत्री मंत्राचा जप अशाप्रकारे केल्याने एक प्रकारची लय तयार होते. यामुळे फुफ्फुसांवर दबाव वाढतो, ज्यामुळे वेगस नस उत्तेजित होते. तिच्या उत्तेजनामुळे वाढलेली हृदयाची गती आणि वाढलेला रक्तदाब कमी होऊ लागतो. यामुळे मेंदूतही चांगले हार्मोन्स स्त्रवतात, ज्यामुळे तणाव कमी होतो. ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे, त्यांना सुद्धा फायदा होतो.

यांच्यावर केले संशोधन

डॉ. शर्मा यांनी संशोधनात 20 अशी कुटुंबं निवडली होती जी गायत्री मंत्राचा नियमित जप करत होती. अशाच प्रकारे 20 अशी कुटुंबं निवडली होती ज्यांनी कधीही गायत्री मंत्राचा जप केला नव्हता. त्यांना आढळले की, जे मंत्राचा जप करत होते, त्यांचा रक्तदाब नियंत्रणात होता. त्यांना झोपसुद्धा चांगली येत होती, तर जे असे करत नव्हते त्यांचा रक्तदाब अनियंत्रित आढळला होता.

हे करू नका

डॉ. शर्मा म्हणतात की, ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे आणि ज्यांच्या हृदयाची गती कमी आहे, त्यांनी या प्रकारे गायत्री मंत्राचा जप करू नये, कारण हे केवळ उच्च रक्तदाब आणि उच्च हृदयगती नियंत्रित ठेवण्यासाठी आहे.

डॉ. शर्मा म्हणाले, मी रूग्णांना औषधासह गायत्री मंत्रजप करण्याचा सल्ला देतो. त्यांनी एक महिन्यापर्यंत प्रत्येक दोन तासात पाच मिनिटापर्यंत याचा जप करावा. यानंतर त्यांनी एका दिवसात तीनवेळा मंत्रजप करावा. कोरोना काळात उच्च रक्तदाब आणि निद्रानाशाचे रूग्ण खुप वाढले आहेत. अशा रूग्णांना याचा लाभ मिळत आहे.