नेपाळनंतर आता बदलला चीनचा सूर ; चायनाचे राजदूत म्हणाले – ‘भारत आणि चीन एकमेकांसाठी नाहीत धोकादायक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमधील भारत-चीन सीमेवर असलेल्या तणावामुळे आता चीनचे सूर बदलले आहेत. प्रथम चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी आशा व्यक्त केली की सीमेवर भारतासह स्थिती सामान्य होईल, आता भारतातील चिनी राजदूताने चर्चेच्या माध्यमातून मतभेद सोडवण्यावर जोर दिला आहे. ते म्हणाले की, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती एकत्र नाचू शकतात. ५ मेपासूनच पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण सीमेवर (एलएसी) तणावपूर्ण वातावरण निर्माण करून भारतावर दबाव आणण्याच्या प्रयत्नात चीन अपयशी ठरत आहे.

आम्हाला संबंध दृढ करायचे आहेत: चिनी राजदूत
भारतातील चिनी राजदूत सन वेईडोन्ग यांनी कॉन्फेडरेशन ऑफ यंग लीडर्स मीटिंगला संबोधित करत भारत आणि चीनमधील संबंध अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपण कधीही आपल्या मतभेदांचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ देऊ नये. हे मतभेद आपण संवादातून सोडवायला हवेत. वेईडोन्ग पुढे म्हणाले की, चीन आणि भारत कोविड-१९ विरुद्ध एकत्रित लढाई लढत आहेत आणि आपले संबंध आणखी दृढ करण्याची जबाबदारी आहे.

ड्रॅगन आणि हत्ती एकत्र नाचू शकतात: वेईडोन्ग
चिनी राजदूतांनी परिषदेत उपस्थित युवकांना भारत आणि चीनमधील संबंध समजून घेण्याचे आवाहन करत म्हटले की, आपण एकमेकांसाठी धोकादायक नाही. ते म्हणाले की, चीन आणि भारत यांच्यातील संबंध आपल्या तरुणांनी अनुभवले पाहिजेत. दोन्ही देश धोका नव्हे तर एकमेकांसाठी संधीचे मार्ग आहेत. ते म्हणाले की, ड्रॅगन आणि हत्ती एकत्र नाचू शकतात.

एलएसीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने कधीच चिथावणी देण्याचे बोलले नाही, पण मंगळवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले असल्याचे वृत्त समोर आले. खरं तर चीनच्या विस्तारवाद केंद्रात त्यांच्या दबावाचे धोरण आहे.