NRC : ३१ ऑगस्ट रोजी लाखो घुसखोर नागरिकांना गमवावे लागणार आपले नागरिकत्व, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाममध्ये बेकायदेशीरपणे स्थायिक झालेल्या नागरिकांना मार्ग दाखविणारी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) अंतिम टप्प्यात आहे. एनआरसीच्या प्रकाशनासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्टची अंतिम तारीख दिली आहे. या मधून आसामच्या नागरिकांची यादी प्रसिद्ध केली जाईल, जेणेकरून या ठिकाणच्या योग्य रहिवाशांची ओळख पटेल सोबतच बांगलादेशातून अवैधपणे घुसखोरी केलेल्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल.

जनआंदोलनास मिळाले यश
आसामच्या जवळ-जवळ ४१ लाख लोकांच्या नागरिकत्वाचे भविष्य या एनआरसीच्या प्रकाशनानंतर निश्चित होणार आहे. आसाम मध्ये घुसखोरी करून करून आलेल्या लाखो बांगलादेशी नागरिकांच्या विरुद्ध राज्यात मागच्या ६ वर्षांपासून जनआंदोलन सुरु आहे. हे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) त्याचाच परिणाम आहे.

हे नागरिकत्व नोंदणी रजिस्टर (NRC ) कसे तयार केले जात आहे. तसेच नागरिकत्वाचे प्रमाण कसे ठरवले जात जाईल. हे माहित करून घेण्याआधी एनआरसी म्हणजे काय..? हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. ही आसाममध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची एक यादी आहे. त्यात कोण भारताचे नागरिक आहेत. कोण भारताचे नागरिक नाहीत तरीही भारतात वास्तव्यास आहेत यातून निश्चित होणार आहे.

महत्वाच्या बाबी
१. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यादी (NRC ) 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

२. यावरून हे निर्धारित होईल कि आसाममधील कोणते लोक भारताचे नागरिक आहेत आणि कोणते नागरिक नाहीत.

३. आलेल्या ३.२९ कोटी अर्जदारांपैकी सुमारे २.९ कोटी लोकांचा या यादीमध्ये समावेश आहे.

४. नाव राहिले असल्यास आसाम सरकार विनामूल्य कायदेशीर मदत देईल.

आरोग्यविषयक वृत्त –