नांदेडमध्ये शनिवारपासून पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील मालेगाव मार्गावरील भक्ती लॉन्समध्ये दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनास देशभरातून अडीच हजार प्रतिनिधी येणार असून दोन दिवसीय अधिवेशनात चर्चासत्रांची वैचारिक मेजवानी मिळणार आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे, अशी माहिती अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व संयोजन समितीचे अध्यक्ष आ.डी.पी.सावंत यांनी दिली आहे.

मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबईचे हे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, झी-न्यूजचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे तर अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा राहणार आहेत. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर सौ.दीक्षा धबाले, खा.हेमंत पाटील, खा.सुधाकर श्रृंगारे, आ.राम रातोळीकर, आ.अमर राजूरकर, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.सुभाष साबणे, आ.प्रदीप नाईक, आ.वसंतराव चव्हाण, आ.डॉ.तुषार राठोड, आ.अमिताताई चव्हाण, आ.नागेश पाटील आष्टीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, माजी आमदार गंगाधर पटणे,  माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कारही होणार आहे.

दुसरे सत्र दुपारी २ ते ३.३० वा. होणार आहे. सोशल मिडीयाचं आव्हान इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मिडियाला पेलवणं आता अवघड झालयं का? यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, दै.सकाळचे संपादक श्रीमंत माने, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशिष जाधव, जेष्ठ संपादक विलास आठवले, न्यूज नेशनचे संपादक सुभाष शिर्के, स्वा.रा.ति.म.वि. नांदेडच्या वृत्तपञ विभागाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, बी.बी.सी. मराठी न्यूजच्या हलिमा कुरेशी या परिसंवादात सहभागी होणार आहेत.

दुसरा परिसंवाद दुपारी ४ ते ५.३० वा.होणार आहे. यात माध्यम स्वातंत्र्य केवळ तोंडी लावण्यापुरतं उरलंय का? यावर परिसंवाद होणार आहे. यात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, डाव्या आघाडीचे नेते भालचंद्र कांगो, जेष्ठ कायदेतज्ञ असिम सरोदे, मुंबई मराठी पञकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सामाजिक कार्यकर्ते मंगल खिंवसरा हे सहभागी होणार आहेत.

दुसऱ्या दिवशी दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वा. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार व परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याशी चर्चा व संवाद होणार असून ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी हे संवादक म्हणून काम पाहणार आहेत. परिषदेचे खुले अधिवेशन सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० वा.दरम्यान होणार आहे. समारोप समारंभ दुपारी २ ते ४ वा. दरम्यान होणार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मुख्य अतिथी म्हणून तर, प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री संभाजी पा. निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व अध्यक्षस्थानी परिषदेचे भावी अध्यक्ष गजानन नाईक हे राहणार असून यावेळी विशेष निमंत्रित म्हणून टाईम्स ऑफ इंडीयाचे वरिष्ठ संपादक प्रफुल्ल मारपकवार, आजतक चे संपादक साहिल जोशी, मुंबई मराठी पञकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धमेंद्र जोरे, टि.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशनचे विनोद जगदाळे, मंञालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे दिलीप सपाटे, महाराष्ट्र श्रमिक पञकार संघाचे प्रदीप मैत्र, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे किरण नाईक, महाराष्ट्र संपादक परिषदेचे संजय मलमे, बीयुजेचे सरचिटणीस इंदरकुमार जैन उपस्थित राहणार आहेत.

या राष्ट्रीय अधिवेशनास पञकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, भावी अध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन, नुतन कार्याध्यक्ष शरद पाबळे, उपाध्यक्ष शिवराज काटकर, राजेंद्रकुमार काळे, विजय दगडू, लातूर विभागीय सचिव विजय जोशी, सदस्य प्रकाश कांबळे, राम शेवडीकर, नुतन सरचिटणीस संजीव जोशी, विभागीय सचिव विनोद जगदाळे (मुंबई), समीर देशपांडे(कोल्हापूर), योगेश कोरडे(नागपूर), प्रमोद माने(औरंगाबाद), अण्णासाहेब बोरगुडे (नाशिक), जगदीश राठोड (अमरावती), सोशल मिडीयाचे समन्वयक अनिल वाघमारे व सोशल मिडीयाचे निमंत्रक बापूसाहेब गोरे आदींसह नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर यांनी केले आहे.

या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असून संयोजन समिती अध्यक्ष आ. डी.पी.सावंत, परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुळकर्णी, शंतनु डोईफोडे, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे, माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, प्रल्हाद उमाटे, केशव घोणसे पाटील, ज्येष्ठ पत्रकार नागनाथ देशमुख, माजी कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र संगनवार, पंढरीनाथ बोकारे, धोंडोपंत विष्णुपुरीकर, अनिल कसबे, आरेफ सत्तार, परिषद प्रतिनिधी नरेश दंडवते, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, प्रदिप वाकोडीकर, हरिहर धुतमल, पवनसिंह बैस, किशन भोयर, यासीन बेग ईनामदार, अभय कुळकजाईकर, जिल्हा समन्वयक कृष्णा उमरीकर, राजेश शिंदे, शिवाजी कोनापुरे, राजेंद्र कांबळे, अ‍ॅड.दिगंबर गायकवाड, जी.पी.मिसाळे, बाळासाहेब पांडे, संजय कोलते, सौ.उज्ज्वला ञिरत्नकुमार भवरे, अनिल धमणे, आजम बेग, हर्ष कुंडलवाडीकर, तुकाराम सावंत, सचिन डोंगळीकर, गजानन चौधरी, नंदकुमार कांबळे, पी.जी.गिलचे, एल.ए.हिरे,  प्रवीण खंदारे, दीपक बाऱ्हाळीकर, धोंडीबा बोरगावे, सुनील पारडे, सुनील पौळकर, संघरत्न पवार, किरण कुलकर्णी, नरेश तुप्तेवार, राजू ताटे, जयराम वन्ने, संभाजी सोनकांबळे, अविनाश पाटील, किरण देशमुख, ज्ञानेश्वर सुनेगावकर, सूर्यकुमार यन्नावार, दिगांबर शिंदे, अमृत देशमुख, अनिल मादसवार, अल्ताफ सानी, स.रवींद्रसिंघ मोदी, गजानन कानडे, सुनील रामदासी, चंदन मिश्रा, शिवाजी फुलवळे, प्रा.शरद वाघमारे, बजरंग शुक्ला, गोपाळ देशपांडे, मो.ताहेर सौदागर, अ‍ॅड.मोहम्मद शाहेद, मोहम्मद तकी, शेख मुंतजीब, प्रशांत गवळी, ईम्रानखान, तालुका समिती अर्धापूरचे फिरेदास हुसैनी, संजय इंगोले, उदय गुंजकर, मुदखेडचे संतोष दर्शनवाड, भोकरचे बी.आर.पांचाळ, राजेश वाघमारे, हिमायतनगरचे ज्ञानेश्वर पंदलवाड, दिलीप शिंदे, धर्माबादचे लक्ष्मण तुरेराव, माहूरचे सरफराज दोसानी, राज पडलवार, किनवटचे दुर्गादास राठोड, गौतम कांबळे, मुदखेडचे ईश्वर पिन्नलवार, संतोष दर्शनवाड, लोह्याचे शेख अहमद, रत्नाकर महाबळे, उमरीचे साहेबराव तुरेराव, मुखेडचे किशोर संगेवार, राजेश बंडे, देगलूरचे शाम मद्देवार, सुभाष शंकपाळे, कंधारचे सत्यनारायण मानसपुरे, योगेंद्रसिंह ठाकूर, नायगावचे माधवमामा कोकुर्ले, स.जाफर, पंडित वाघमारे, मुखेडचे किशोर संगेवार, बिलोलीचे दादाराव इंगळे, गणेश कञुवार, रत्नाकर जाधव, मुक्रमाबादचे दत्ता माळेगावे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी, पञकार व सदस्य परिश्रम घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –