तमिळनाडुत ‘सिद्ध चिकित्सा’ पद्धतीनं सुमारे 6000 ‘कोरोना’ रूग्ण झाले बरे, जाणून घ्या कसा केला जातो उपचार

चेन्नई : वृत्त संस्था – पारंपरिक सिद्ध चिकित्सा पद्धतीची औषधे कोविड-19 रूग्णांच्या उपचारात खुप परिणामकारक ठरत आहेत आणि तमिळनाडुत कोरोना व्हायरसने संक्रमित सुमारे सहा हजार रूग्ण या उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सात ऑगस्टपर्यंत तमिळनाडुत दोन महानगरांसह विविध ठिकाणी स्थापन 11 विशेष सिद्ध कोविड-19 रूग्ण देखभाल केंद्रात (सीसीसी) दाखल 5,725 कोरोना संक्रमित रूग्ण सिद्ध पद्धतींच्या औषधांनी बरे झाले आहेत.

मोठ्या संख्येने रूग्ण झाले बरे
चेन्नईच्या जवाहर विद्यालय आणि व्यासर्पदी येथील डॉ. आंबेडकर राजकीय कला महाविद्यालयात स्थापन सिद्ध सीसीसीमध्ये सात ऑगस्टपर्यंत पर्यंत 3,200 लक्षणे नसलेल्या कोविड-19 रूग्णांवर सिद्ध औषधांद्वारे उपचार करण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, 434 रूग्णांवर येथील दोन केंद्रात उपचार सुरू आहे, 715 रूग्ण जिल्ह्याच्या 12 सिद्ध सीसीसीमध्ये दाखल आहेत.

तर चेन्नईशिवाय वेल्लोरमध्ये सर्वात जास्त 1,258 कोविड-19 रूग्णांवर सिद्ध पद्धतीने उपचार सुरू आहे. थेनी येथील दोन सिद्ध सीसीसी शिवाय तिरुवन्नामलाई, थाचर, थिरुपथुर, रानीपेट, तेनकाशी, विल्लुपुरम आणि कोइमतूरमध्ये सुद्धा विशेष केंद्र सुरू आहेत. आणखी दोन केंद्र सेलम आणि पुडुकोट्टाईमध्ये नुकतीच सुरू केली आहेत.

यापूर्वी राज्य सरकारने औषधी वनस्पतीने तयार आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी आणि व्हायरसविरूद्ध लढण्यास सक्षम सिद्ध पद्धतीचे औषध कबसुरा कुदीनीर ला एकात्मिक उपचारात सहभागी करण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी एप्रिलमध्ये आयुष मंत्रालयासोबत विशेष कार्यक्रम आरोग्यम लाँच केला होता. ज्यामध्ये कोविड-19 च्या उपचारासाठी आयुर्वेद, योग, नैसर्गिक चिकित्सा, यूनानी, सिद्ध आणि होमियोपॅथीचा समावेश केला होता. सिद्ध पद्धती भारतात सर्वात जुनी चिकित्सा पद्धती मानली जाते. या चिकित्सा प्रणालीच्या विकासात अनेक सिद्धकर्त्यांनी योगदान दिले आहे. ही प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात प्रचलित आहे.

सिद्ध चिकित्सा पद्धतीने उपचार प्रामुख्याने तमिळनाडु आणि केरळात केला जातो. अगस्त्य ऋषींना तामिळ भाषा आणि सिद्ध चिकित्सा दोन्हींचे जनक मानले जाते. त्यांनी सिद्ध चिकित्सा, औषधी आणि सर्जरीशी संबंधित अनेक ग्रंथ लिहिले, ज्यांचा वापर आज सुद्धा सिद्ध चिकित्सक करतात. सिद्ध चिकित्सेचा मुलभूत सिद्धांत आयुर्वेदाशी खुप मिळता-जुळता आहे, परंतु सविस्तर अभ्यास केल्यानंतर दोन्हीतील फरक समजतो. सिद्ध पद्धतीची परंपरा आणि वैशिष्ट्य तमिळनाडुच्या द्रविड संस्कृतीशी संबंधित आहे.

सिद्ध आणि आयुर्वेदात सर्वात मोठे अंतर हे आहे की, सिद्ध औषध बनवण्यात औषधी वनस्पतींसह धातु आणि खनिज पदार्थ जसे – सल्फर, अभ्रक, पारा इत्यादीचा वापर केला जातो. सिद्ध औषधांची 3 श्रेणीत विभागणी केली जाते. पहिले, थावरम म्हणजे वनस्पती (हर्बल) द्वारे तयार औषध. दूसरे, थाथू म्हणजे इनऑर्गेनिक पदार्थांपासून तयार केलेले औषध. तिसरे, जंगामम म्हणजे जनावरांच्या उत्पादनांपासून तयार केलेले औषध.

तर, सिद्ध पद्धती अंतर्गत करण्यात येणार्‍या उपचाराला 3 वेगवेगळ्या श्रेणीत विभागले जाते. पहिला उपचार – देव मारुथुवम म्हणजे दैवीय पद्धती ज्यामध्ये धातु आणि खनिजातून प्राप्त औषधाच्या वापरावर लक्ष दिले जाते. दूसरा उपचार – मानिदा मारुथुवम किवा तर्कसंगत पद्धत ज्यामध्ये वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधांचा वापर होतो. तिसरा उपचार – असुर मारुथुवम किंवा सर्जिकल पद्धत ज्यामध्ये छेद दिले जातो आणि ऑपरेशन होते.