COVID-19 : फुफ्फुसांसाठी जीवघेणा असलेला ‘कोरोना’ आणखी 4 अवयवांना देखील पोहचवू शकतो मोठं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्राणघातक कोरोना विषाणूच्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या लोकांना प्रश्न पडत आहे की, हा विषाणू केवळ फुफ्फुसांना निकामी करतो की मग शरीराच्या इतर भागास देखील नुकसान पोहोचवतो. याचे उत्तर मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे डॉ. नरेश गुप्ता यांनी दिले आहे. ते म्हणाले की हा विषाणू श्वासोच्छवासाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो आणि मुख्यतः चार अवयवांवर त्याचा परिणाम होतो. ते म्हणजे फुफ्फुस, श्वसन प्रणाली, मूत्रपिंड आणि आतडे. त्यांनी जर्मनीच्या त्या अहवालास बरोबर सांगितले ज्यात सांगितले गेले आहे की हा विषाणू मूत्रपिंडावरही परिणाम करू शकतो, तसेच ते म्हणाले की आतड्यात किंवा मूत्रपिंडात या विषाणूचे इतके भयानक रूप नसते जितके फुफ्फुसांमध्ये असते.

ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या मुलाखतीत डॉ. नरेश म्हणाले, ‘श्वसन प्रणालीव्यतिरिक्त हा विषाणू मूत्रपिंडात देखील सक्रिय असतो, परंतु येथे इतके नुकसान पोहोचवत नाही जितके नुकसान फुफ्फुसांना पोहोचवतो.’

त्यांनी पुढे स्पष्ट केले की बहुतेक प्रकरणांमध्ये या विषाणूचा हल्ला हा फुफ्फुसांवर असतो, जेथून तो मानवी शरीरात प्रवेश करतो. येथे त्याच्या प्रवेशानंतर सूज येते आणि न्यूमोनियाची लक्षणे दिसतात. या व्यतिरिक्त हा विषाणू शरीरातील इतर काही भागात जाऊ शकतो, जसे की आतडे, मूत्रपिंड इ. तर सर्वात आधी याचा हल्ला फुफ्फुसांवर होतो आणि येथे अधिक नुकसान पोहोचवतो, त्यामुळेच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) आतापर्यंत 3 लाख 2 हजार 956 नमुन्यांची तपासणी केली आहे. काल देशातील विविध सरकारी आणि खासगी चाचणी केंद्रांमध्ये 27 हजार 256 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. या प्राणघातक विषाणूने 2019 च्या डिसेंबरमध्ये चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथून प्रवास सुरू केला आणि एप्रिल 2020 च्या मध्यापर्यंत संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले.