Corona Lockdown : मुंबई, पुणे, कोलकत्ता, जयपूर, इंदौरसह काही शहरांची परिस्थिती ‘गंभीर’, गृह मंत्रालयानं दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने आज देशाच्या काही शहरांमध्ये कोरोना व्हायरसची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर, कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या काही भागात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्यास व्हायरस पसरण्याचा धोका असल्याचा इशाराही सरकारने या शहरांना दिला आहे.

गृह मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या फ्रंटलाइन असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांवर अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, सामाजिक सुरक्षा नियमांचे पूर्ण उल्लंघन आणि शहरी भागातील वाहनांची ये-जा अशा अनेक घटना घडल्या आहेत, या सगळ्या बंद केल्या पाहिजे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या ५४३ झाली आहे, तर देशात आतापर्यंत एकूण १७,२६५ रुग्ण आढळले आहेत. मंत्रालयाने म्हटले की, मध्य प्रदेशच्या इंदूर, महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानच्या जयपूर, पश्चिम बंगालच्या कोलकाता, हावडा, पूर्व मेदिनीपूर, उत्तर २४ परगना, दार्जिलिंग, कालीमपोंग आणि जलपाईगुडी येथे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

मंत्रालयाने सांगितले की या ठिकाणी लॉकडाऊनच्या उल्लंघनांचे प्रकार घडले आहेत. अशा परिस्थितीत हे सर्वसामान्यांसाठी धोका निर्माण करू शकते. केंद्र सरकारने या ठिकाणी COVID-19 परिस्थितीचे ऑन-स्पॉट मूल्यांकन आणि निवारण करण्यासाठी चार राज्यात- मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालला मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी सहा आंतर-मंत्रालयीन केंद्रीय संघ (आयएमसीटी) तयार करण्यात आले आहेत.

गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की आंतरमंत्रिय केंद्रीय संघ (आयएमसीटी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाऊनची पूर्तता व अंमलबजावणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, शारीरिक अंतर, आरोग्य पायाभूत सुविधा तयार करणे, आरोग्य व्यावसायिक आणि कामगारांचे संरक्षण आणि गरीब लोकांचे संरक्षण मदत शिबिरांच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करेल.