Coronavirus: ‘व्हिटॅमिन-सी’नं कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न, चीननंतर अमेरिकेमधील जणाकारांनी स्विकारलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  न्यूयॉर्कमधील हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या रुग्णांना डॉक्टर व्हिटॅमिन-सी चा कडक डोस देत आहेत. खरंतर शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत बनवण्यासाठी व्हिटॅमिन-सी चीनच्या डॉक्टरांनीही कोरोनाच्या रुग्णांचा उपचार करण्यासाठी वापरले असताना याचा परिणाम चांगला दिसला होता.

चांगली रिकव्हरी होते

न्यूयॉर्कच्या नॉर्थवेल हेल्थ हॉस्पिटलचे डॉ. अँड्र्यू वेबर यांनी सांगितले की, कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे उपाचार सुरु होताच १५०० एमजी व्हिटॅमिन-सी चा डोस शिरांमधून देतो. यानंतर दिवसातून तीन ते चार वेळा आणखी व्हिटॅमिन-सी चे डोस शरीरात दिले जातात. खरंतर व्हिटॅमिन-सी चा अतिरिक्त डोस देण्याचे काम वुहानच्या झोंगनन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुरु केले होते. तेव्हा डॉक्टरांना आढळले की, ज्या रुग्णांना इतर औषधांसोबत व्हिटॅमिन-सी चा डोस दिला गेला आहे त्यांची रिकव्हरी लवकर होत आहे. त्यांच्यात व्हिटॅमिन-सी न घेणाऱ्यांपेक्षा खूप लवकर रिकव्हरी दिसून आली.

एका वेळी १६ डोस

चिनी डॉक्टरांच्या या अनुभवावर अमेरिकी डॉक्टरही हा उपाय करत आहेत. डॉक्टर वेबर यांनी त्यांचा अनुभव सांगताना म्हटले की, अमेरिकेत एका वयस्क पुरुषाला ९० आणि महिलेला ७५ मिलिग्रॅम दिवसाला व्हिटॅमिन-सी ची गरज असते, पण एका कोरोनाच्या रुग्णाला याच प्रमाणात १६ वेळा डोस एका वेळेला दिला जातो. ते म्हणाले की, रुग्णांना व्हिटॅमिन-सी सोबतच मलेरियाचे औषध हायड्राक्सीक्लोरोक्वीन आणि अँटिबायोटिक्स एजेथ्रोमायसीन दिले जात आहे. याशिवाय रक्ताला पातळ करणारे औषधही दिले जात आहे.

डॉ. वेबरनुसार, कोरोना संक्रमणाचा जास्त प्रादुर्भाव होतो तेव्हा शरीरात सेप्सिस तयार होते. यामुळे शरीरात व्हिटॅमिन-सी ची पूर्ण कमतरता उद्भवते. यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात खराब होते. तिला दुरुस्त करण्यासाठी रुग्णाला भरपूर व्हिटॅमिन-सी दिले जाते.