Coronavirus : देशात फोफावतेय ‘महामारी’, 12 तासात 131 जणांना झाला ‘कोरोना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 12 तासात 131 लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यानंतर, गुरुवारी भारतात कोरोना विषाणूची एकूण संख्या 1965 वर गेली आहे. यापैकी 1764 सक्रिय प्रकरणे आहेत. त्याचबरोबर 151 लोकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 50 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे

भारतात कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणामधून नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रात 335 प्रकरणे नोंदली गेली असून त्यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 265 संक्रमित रुग्ण असून तेथे 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूची 234 प्रकरणे नोंदली गेली असून तेथे एकाचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय राजधानीमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 152 वर पोहोचली आहे. त्यापैकी 6 जण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये 108 रूग्ण, उत्तर प्रदेशात 113 रुग्ण आणि कर्नाटकात 110 रूग्ण आहेत. देशात कोरोना विषाणूची 100 प्रकरणे आहेत. चंडीगडमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या 9 लोकांचा शोध घेण्यात आला आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये 62 आणि लडाखमध्ये 13 रुग्णांची पुष्टी झाली आहे. ईशान्येकडील मिझोरम, मणिपूर आणि आसाममधून एक-एक प्रकरणाची पुष्टी झाली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना विषाणूबद्दल बनावट बातम्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाचे सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना असे कळविण्यात आले आहे की, केंद्र सरकार अशा प्रकारच्या वृत्तांचा सामना करण्यासाठी वेब पोर्टल तयार करत आहे.