Coronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 4067 वर, आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू, 12 तासात 490 नवे रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाने कहर माजवला आहे. देशात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100 पार झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारी (6 एप्रिल) सकाळी 9 वाजताच्या आकडेवारी नुसार , गेल्या १२ तासांत 490 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, भारतात एकूण कोरोना प्रकरणांची संख्या 4000 ओलांडली आहे. सध्या भारतात एकूण 4067. रुग्ण आढळले असून त्यापैकी 3666. रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 292 रुग्ण बरे झाले आहेत, तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडु आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोरोनाचा संसर्ग देशातील 30 राज्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक 748 कोरोनाची नोंद झाली आहे, तर तामिळनाडू 571 रुग्णांसह दुसर्‍या क्रमांकावर आणि दिल्ली 503 कोरोना रुग्णांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत येथे 748 प्रकरणे नोंदली गेली असून त्यापैकी 56 लोक बरे झाले आहेत. यासह येथे 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तामिळनाडू देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत 571 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यापैकी 8 बरे झाले आहेत. तामिळनाडूमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाची 503 प्रकरणे नोंदली गेली असून त्यापैकी 18 जण बरे झाले आहेत. त्याचवेळी दिल्लीत कोरोनामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये आतापर्यंत 321 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 34 लोक बरे झाले आहेत. तेलंगणात कोरोनामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत केरळमध्ये 314 रुग्ण नोंदले गेले आहेत, त्यापैकी 55 लोक बरे झाले आहेत, तर २ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर राजस्थानमध्ये 253 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी २१ जण बरे झाले आहेत. .

विशेष म्हणजे, एकूण प्रकरणांपैकी जवळपास 30 टक्के प्रकरणे दिल्लीच्या तबलीघी जमातशी संबंधित आहेत, गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन भागात इस्लामिक पंथाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.