चीन : कोरोना व्हायरसचे 170 बळी, Google नं सर्व कार्यालयाला लावलं कुलूप

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना या व्हायरसमुळे 170 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबतची 1700 हुन अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये देखील याबाबतचे पाचवे प्रकरण समोर आले आहे. त्यातच वूहान येथून आणलेले तीनही जपानी नागरिक संक्रमित असल्याचे उघड झाले आहे. तिबेटमध्ये देखील कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण समोर आले आहे.

गुगलने हा व्हायरसमुळे चीनमधील आपल्या सर्व कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चीन, हॉगकॉंग आणि तायवान मधील सर्व कार्यालयांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य समिती आज दुसऱ्यांदा याबाबत बैठक घेणार आहे.

नर न्यू इयर वेळी चिनी लोक प्रवास करतील. हे लक्षात घेता व्हायरस पसरण्याच्या भीतीने चीनने प्रवास करण्यास बंदी घातली आहे. डझनहून अधिक शहरांमधील 56 मिलियनपेक्षा जास्त लोकांवर याचा परिणाम होईल. डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात या विषाणूचा उगम झाला आणि त्यानंतर तो जगभरातील अनेक शहरांमध्ये पसरला. डब्ल्यूएचओच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जगभरात 6000 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आरोग्य विभागाच्या मागील बैठकीमध्ये डब्ल्यूएचओ ने असे सांगितले होते की, इतक्या लवकर कोरोनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहीर करणे खूप घाईचे ठरेल. डब्ल्यूएचओ के महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी सांगितले की, या व्हायरसचा प्रसार वाढतच चालला आहे आणि हा खूप चिंतेचा विषय देखील आहे.

फेसबुक पेज लाईक करा –