Gujarat Coronavirus Updates : गुजरातमध्ये सापडले 8 नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आतापर्यंत एकूण 82 संक्रमित

अहमदाबाद  :  वृत्तसंस्था –   पुर्ण देशभरात तसेच गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अहवालानुसार गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 8 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या आता 82 वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व नवीन प्रकरणे अहमदाबादचे असून कोविड -19 मुळे हे शहर भारतातील सर्वाधिक प्रभावित केंद्र ठरले आहे.

राज्याचे प्रमुख आरोग्य सचिव जयंती रवी यांनी सांगितले की, 8 नवीन रुग्णांपैकी 4 रुग्ण इतर राज्यात फिरून परत आले आहेत, तर उर्वरित 3 जणांचे स्थानिक संसर्गाची प्रकरणे आहेत. त्याचवेळी एका व्यक्तीने नुकताच परदेश दौरा केला होता. यासह राज्यात लोकल संक्रमण रुग्णांची संख्या 41 पर्यंत पोहोचली असून परदेशात जाणाऱ्यांची संख्या 33 आहे. याव्यतिरिक्त इतर राज्यात प्रवास करणारे 8 रुग्ण आहेत.

गुजरातमध्ये व्हायरसने 6 जणांचा बळी घेतला आहे

या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 6 रुग्णांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे. त्याचबरोबर 66 जणांची प्रकृती स्थिर आहे तर 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गुजरात हे देशातील सर्वात जास्त प्रभावित राज्यांपैकी एक आहे आणि अहमदाबादमध्ये वाढत्या घटनांनी सरकारला चिंतेत टाकले आहे. तथापि, 6 लोक ठिक झाल्यामुळे वैद्यकीय कामगार तसेच रुग्णांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.