Coronavirus : दिल्लीतील निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमाला UP, MP आणि महाराष्ट्रातून गेले होते शेकडो लोक, ‘इथं’ पाहा यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देश कोरोना व्हायरसशी सामना करत असून निजामुद्दिनमध्ये तबलिगी जमात केंद्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. रिपोर्टनुसार, या केंद्रात देशविदेशातून आलेले १८०० लोकं थांबली होती. ही सगळी लोकं धार्मिक समारंभात भाग घेण्यासाठी दिल्लीच्या निजामुद्दिनमधील केंद्रात आले होते. यात भाग घेणारे अनेक लोकं आपापल्या राज्यात परतले होते, ज्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे.

युपीमधील १५६, महाराष्ट्रातील १०९ लोकं
तामिळनाडूमधून ५०१, आसाममधून २१६, उत्तर प्रदेश येथून १५६, महाराष्ट्रातून १०९, मध्य प्रदेशातून १०७, बिहारमधून ८६, पश्चिम बंगालमधून ७३, हैद्राबाद येथून ५५, रांचीमधून ४६ जण आले होते. तर इतर ठिकाणाहून अंदमान येथून २१, हरियाणातून २२, हिमाचल प्रदेशातून १५, कर्नाटकमधून ४५, केरळमधून १५, मेघालयातून ५, ओडिसा येथून १५, पंजाबमधून ९, राजस्थान येथून १९ आणि उत्तराखंड येथून ३४ लोकं तबलिगी जमातीच्या सभेत उपस्थित असल्याची नोंद केली गेली होती. याशिवाय २८१ परदेशी पाहुणे देखील सहभागी होते आणि एकूण संख्या १८३० होती.

१८ मार्चला झाला होता मोठा कार्यक्रम
निजामुद्दिनमधील केंद्रात तबलिगी जमातीमध्ये १८ मार्चला एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शेकडो लोकं जमले होते. पण आता कोरोना व्हायरसचे प्रकरण समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. आतापर्यंत केंद्रातून हजारो लोकांना काढले गेले आहे. यातील २४ लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची पुष्टी झाली आहे. येथून काढलेल्या लोकांमध्ये ३३४ लोकं रुग्णालयात भरती आहेत आणि बाकी तब्बल ७०० लोकांना क्वारंटाइन मध्ये ठेवले गेले आहे.

You might also like