भारतीय रेल्वे 2-3 दिवसात सुरु करणार काउंटर बुकिंग, अवघ्या अडीच तासात विकली गेली 5 लाख तिकिटे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दोन ते तीन दिवसांत भारतीय रेल्वेचे काऊंटर बुकिंग सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज माहिती देताना सांगितले कि, उद्यापासून रेल्वे विभाग 1.7 लाख सामान्य सेवा केंद्रांवर तिकिटांचे बुकिंग सुरू करणार आहे. यावेळी काउंटरवर बुकिंग सुरू होताना गर्दीची कोणतीही परिस्थिती निर्माण होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल.

रेल्वेमंत्री म्हणाले की, पूर्वी ज्यांनी काउंटर बुकिंग केले होते आणि ज्यांना आतापर्यत परतावा मिळू शकला नाही, त्यांना रेल्वे काउंटरवर बुकिंग सुरू झाल्यानंतर तिथे जाऊन पैसे परत मिळू शकतील. तसेच काही दिवसांत आणखी ट्रेन सेवाही सुरू केल्या जातील. त्यांनी सांगितले की, आजपासून 100 मार्गांवर धावणाऱ्या 200 गाड्यांसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करायचे होते. पण ईशान्येकडील चक्रीवादळामुळे इंटरनेटच्या समस्येमुळे केवळ 75 मार्ग सुरू केले गेले आहेत. आज सकाळी दहा वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंगसाठी अवघ्या अडीच तासात 5 लाख तिकिटे विकली गेली असल्याचे गोयल यांनी सांगितले.