सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी उघडलं देशातील पहिलं ‘नाइट शेल्टर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलकत्तामध्ये देह विक्रीच्या दलदलीत फसलेल्या महिलांची मुले आता शिक्षण आणि आरोग्यच्या सुविधापासून वंचित राहणार नाही. ते शाळामध्ये येऊन शिक्षण घेतील. चांगले जेवण जेवतील आणि योग्य मार्गदर्शनाने उज्जवल भविष्याच्या दिशेने प्रवास करतील. 57 वर्षाच्या ऊर्मि बासू यांच्या 20 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर याचा चांगला परिणाम म्हणून 2000 मुलांचे जीवन शिक्षणाने उज्जवल झाले आहे.

नारी शक्ती सन्मानाने केला गौरव –
विशेष म्हणजे यातील अनेक मुलं आता आपल्या जीवनाच्या सुंदर वाटेवर आहेत आणि सध्या देशातील प्रतिष्ठीत संस्थांमध्ये मोठ्या पदावर काम करत आहेत. नारी शक्ति सन्मानाने पुरस्कृत कलकत्तामध्ये ऊर्मि बासूंना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी देशातील पहिले नाइट शेल्टर स्थापन करण्याचे श्रेय जाते. ऊर्मि यांनी महिलांच्या कल्याणार्थ केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मागील वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती सन्मान प्रदान करण्यात आला.

आतापर्यंत 2000 मुलांचे जीवन शिक्षणाने उजळले –
ऊर्मि दरवर्षी जवळपास 100 मुलांना आधार देत त्याचे भविष्य उज्जवल करण्याच्या दिशेने प्रयत्न करतात. जादवपूर शहीद नगर भागात राहणाऱ्या ऊर्मि यांनी सांगितले की 20 – 21 वर्षाच्या वयात जेव्हा मी मुंबईत टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये क्रिमिनोलॉजी आणि करेक्शनल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत होते तेव्हा इंटर्नशिप दरम्यान मला मुंबईतील रेड लाइट एरिया जवळून पाहता आला.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं ग्राहकांसाठी दारु सिगारेट खरेदी करुन आणण्याचे काम करत होते. शिक्षण कशाला म्हणतात हेच त्यांना माहिती नव्हते. त्यांचा त्रास मला पाहावला गेला नाही. त्यानंतर मी कलकत्तामध्ये येऊन हे काम सुरु केले, जेथे अशियाचा एक मोठा रेड लाइट एरिया आहे. खासगी संस्थांसह ग्रामीण महिलांचा समूह जोडून कामाचा व्याप आणखी वाढला. वर्ष 2000 मध्ये आम्ही न्यू लाइट नावाची संस्था स्थापन केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/