Coronavirus : ‘कोरोनाचा’ जगभरात ‘हाहाकार’ ! आतापर्यंत 74 हजार लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसमुळे जगभरात मंगळवारपर्यंत 1,322,477 पेक्षा अधिक लोकांना संक्रमण झाले आहे, तर या महामारीमुळे 74,087 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, अमेरिकेत 10 हजार पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे, तर 3 लाख 68 हजार लोक संक्रमित आहेत.

तर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर फ्रान्समध्ये 24 तासात 833 मृत्यू झाले ज्यानंतर तेथे मृतांचा आकडा 9 हजाराच्या घरात गेला. तर जपान खबरदारी म्हणून आजपासून इमरजेन्सीची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकेत मृतांचा आकडा 10 हजार पार –

अमेरिकेत कोरोनामुळे मृतांचा आकडा सोमवारी 10,000 पार गेला. अधिकाऱ्यांच्या मते सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या आजाराविरोधात कोरोनाविरोधात लढा आधिक बळकट होत आहे. सोमवारपर्यंत 10,800 पेक्षा अधिक अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकी वैज्ञानिक या महामारीच्या विरोधात लढा येणारे वॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

फ्रान्सची स्थिती भयानक –

फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे सोमवारी 833 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत 8,911 लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपात इटली आणि स्पेनपेक्षा जास्त भयानक अवस्था फ्रान्सची आहे.

इटलीमध्ये आतापर्यंत 16,523 लोकांचा मृत्यू –

इटलीत अपेक्षा आहे की मरणाऱ्यांची संख्या कमी होईल, परंतु सोमवारी रविवारच्या तुलनेत जास्त 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. सोमवारी इटलीमध्ये कोरोनामुळे 636 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर रविवारी 525 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या महामारीमुळे 16,523 लोकांचा मृत्यू झाला. इटलीत कोरोनाचे सर्वात जास्त बळी गेले आहेत. याशिवाय 1 लाख 30 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सोमवारी 3599 नवे कोरोनाग्रस्त इटलीमध्ये आढळले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like