COVID-19 : ‘कोरोना’नं आजारी पडण्याचा दर 6.73 %, अनेक राज्यांच्या सरासरीपेक्षा कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसने सर्वात प्रभावित देशांमध्ये भारत रशियाला मागे टाकत तिसर्‍या नंबरवर आला आहे. देशात कोविड-19 चा प्रसार कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत मिळून काम करत आहे. केंद्राने राज्यांमध्ये टेस्टींग वाढवणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आणि प्रकरणांमध्ये वेळेत वैद्यकीय मदत पोहचवण्याचे काम केले आहे. केंद्राने राज्यांची टेस्टींग क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा उल्लेखनीय मदत केली आहे, ज्याचा परिणाम दिसत आहे. देशात कोरोना व्हायरस टेस्टींगच्या पॉझिटीव्ह रिपोर्टचा दर कमी झाला आहे, सध्या राष्ट्रीय पॉझिटिव्ह दर 6.73% आहे. तर दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेशसह 21 राज्यांमध्ये कोविड-19मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर सरासरी 60.77 टक्केच्या तुलनेत जास्त आहे.

21 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 रूग्णांचा बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंडीगढ (85.9 टक्के), लडाख (82.2 टक्के), उत्तराखंड (80.9 टक्के), छत्तीसगढ (80.6 टक्के), राजस्थान (80.1 टक्के), मिझोरम (79.3 टक्के), त्रिपुरा (77.7 टक्के), मध्यप्रदेश (76.9 टक्के), झारखंड (74.3 टक्के), बिहार (74.2 टक्के), हरियाणा (74.1 टक्के), गुजरात (71.9 टक्के), पंजाब (70.5 टक्के), दिल्ली (70.2 टक्के), मेघालय (69.4 टक्के), ओडिसा (69.0 टक्के), उत्तरप्रदेश (68.4 टक्के), हिमाचल प्रदेश (67.3 टक्के), पश्चिम बंगाल (66.7 टक्के), आसाम (62.4 टक्के) आणि जम्मू-काश्मीर (62.4 टक्के) प्रमुख आहेत.

एवढेच नव्हे, या 9 राज्यांमध्ये टेस्टींगची टक्केवारी राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.

भारत (राष्ट्रीय)
6.73%
6859 प्रति 10 लाख

पुदुचेरी
5.55%
12,592 प्रति 10 लाख

चंडीगढ
4.36%
9090 प्रति 10 लाख

आसाम
2.84%
9987 प्रति 10 लाख

त्रिपुरा
2.72%
10,941 प्रति 10 लाख

कर्नाटक
2.64%
9803 प्रति 10 लाख

राजस्थान
2.51%
10,445 प्रति 10 लाख

गोवा
2.5%
44,129 प्रति 10 लाख

पंजाब
1.92%
10,257 प्रति 10 लाख

दिल्लीत केंद्राच्या प्रयत्नांनी बदलले चित्र

दिल्लीत केंद्र सरकारने तपासण्यांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयतन केले. नव्या रॅपिड अँटीजन पॉईंट-ऑफ-केयर तपासण्यांसह आरटी-पीसीआर तपासण्या वाढवण्यात आल्या, ज्यांचा रिपोर्ट केवळ 30 मिनिटात मिळतो.

केंद्राने केलेल्या प्रयत्नांमुळे प्रति दिवस करण्यात येणार्‍या तपासण्यांची सरासरी संख्या जी 1 ते 5 जून 2020 दरम्यान केवळ 5481 होती, ती आता 1 ते 5 जुलै 2020च्या दरम्यान प्रति दिवस सरासरी 18,766 तपासण्यांपर्यंत पोहचली आहे. दिल्लीत तपासण्यांमधील उल्लेखनीय वाढीसह, पॉझिटिव्ह दरात मागील तीन आठवड्यात सुमारे 30% ते 10% पर्यंतची कमी दिसून आली आहे. या कालावधीत एकुण संख्येतील वाढ पाहता, हा एक दिवस आहे जेव्हा 24 तासात पॉझिटिव्ह दर 13 टक्केपेक्षा जास्त होता.

देशात 6.73 लाख लोक संक्रमित

भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या 6.73 लाख आणि मृतांची संख्या 19,268 झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोविड-19 चे आतापर्यंत 4,09,082 रूग्ण बरे झाले आहेत. मंत्रालयाच्या आज सकाळी आठ वाजताच्या आकड्यांनुसार, सध्या देशात कोरोना व्हायरसने संक्रमित 2,44,814 लोकांवर उपचार सुरू आहेत.