Benefits of Curry Leaves : गुणकारी आहे कडीपत्ता, ‘या’ रोगांपासून ठेवतो दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कडीपत्त्याची पाने फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच वापरली जात नाहीत तर त्याचा औषध म्हणून देखील उपयोग होतो. साधारणपणे कडीपत्त्याचा वापर जेवण अधिक रुचकर व्हावं यासाठी केला जातो. पण कडीपत्त्यामध्ये असणारे अनेक औषधी घटक शरीरासाठी उपयोगी असतात.

पचनसंस्था सुरळीत राहते: कडीपत्ता खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत काम करते. ज्यांना गॅस किंवा अपचन अशा समस्या आहेत, त्यांच्यासाठी कडीपत्ता खाणे फायदेशीर ठरते. डॉक्टरांच्या मते, जर पचनसंस्था सुरळीत असेल तर वजन अधिक वाढण्याची शक्यता कमी असते. कडीपत्ता जेवणात खाल्ल्याने किंवा चावून खाल्ल्याने शरीरातील हानिकारक तत्व बाहेर निघून जातात. यामध्ये डिटॉक्सिफाय करण्याचे गुण आढळतात.

मधुमेहाचे प्रमाण कमी होते : कडीपत्ता अँटीऑक्ससिडेंट्सचा स्रोत आहे. कडीपत्ता ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित करण्याचं काम करतो आणि शरीरातील कार्बोहायड्रेटचे शोषण थांबवतो. यामुळे रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील संतुलित राहण्यास मदत होते. कडीपत्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल भरपूर प्रमाणात असते. जो इन्शुलिनचे वाढते प्रमाण रोखण्यास मदत करतो.

लिव्हर राहते निरोगी : कडीपत्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण असते, जे लिव्हरसाठी उपयुक्त असतात. सकाळी उठल्यावर कडीपत्त्याची 10-12 पाने चावून खाल्ल्यास युरिक ऍसिड नियंत्रित राहते. कडीपत्याच्या पानांमध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण देखील असते.

केसांची चमक वाढते : कडीपत्याच्या पानांमध्ये बिटाकेरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस गळणे थांबतात आणि केसांना चमक येते, केस वाढतात. यामध्ये अमिनो ऍसिडचे प्रमाण असते त्यामुळे केस लांब आणि दाट होतात. कडीपत्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी 3 असते, तसेच आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम असते. कडीपत्याच्या पानांचा उपयोग हेअर आणि स्किन ट्रीटमेंटमध्ये केला जातो.