कोरोना लशीच्या बनावट SMS व्दारे होतोय सायबर अटॅक, कॉन्टॅक्ट लिस्ट धोक्यात; तशा लिंकपासून सावधान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने लोकांना कोविड-19 च्या व्हॅक्सीन नोंदणीच्या बनावट एसएमएसपासून सावध केले आहे, ज्याच्याद्वारे युजरच्या अँड्रॉईड फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये घुसखोरी केली जात आहे. या घातक एसएमएसचे किमान पाच प्रकार सांगितले जात आहेत.

सरकारने व्हॅक्सीनच्या रजिस्ट्रेशनसाठी कोविन पोर्टल तयार केले आहे, परंतु एक वायरल मेसेज सोशल मीडियावर खुप शेयर होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, या मेसेजसह मिळत असलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते आणि लवरकच व्हॅक्सीन घेता येऊ शकते. या मेसेज सोबतच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये एक बनावट अ‍ॅप डाऊनलोड होत आहे. सोबतच ते एसएमएस यूजरच्या कॉन्टॅक्ट लिस्टला सुद्धा हॅक करत आहे.

अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे की, यूजर्सना फिशिंग पासून वाचण्यासाठी प्रत्येक बनावट डोमेन्स, ईमेल आणि टेक्स्ट मेसेजपासून दूर राहावे लागेल जे कोविड-19 च्या वॅक्सीनच्या नोंदणीचा दावा करतात. अ‍ॅडव्हायजरीमध्ये सल्ला देण्यात आला आहे की, अशाप्रकारे डेटा चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी यूजर्सनी आपल्या मोबाइल फोनच्या सेटिंगमध्ये बदल करून कोणत्याही अविश्वसनीय स्त्रोतांकडून आलेले अ‍ॅप इन्स्टॉलेशन स्वीकारू नका.

लक्षात ठेवा की भारत या जागतिक महामारीपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी देशातच निर्मित दोन व्हॅक्सीन कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन प्रौढांना देण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना 18 कोटी व्हॅक्सीन दिल्या आहेत.