Cyclone Amphan : ‘अम्फान’ चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये 2 ठार, हावडा येथे लहान मुलीवर झाड पडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5227 घरांचे नुकसान झाले आहे. हावडा येथे एका 13 वर्षाच्या मुलीच्या अंगावर झाड पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर 24 परगणामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी 7 पर्यंत कोलकता येथे पोहचणार चक्रीवादळ, ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळ अम्फान सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ सुंदरबनवरून जात आहे. संध्याकाळी 7 पर्यंत ते कोलकाताजवळ पोहचेल. त्यांनी सांगितले की, चक्रीवादळ जमिनीला धडकण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये ताशी 160 प्रतितास किमी वेगाने वारे वाहत असल्याची माहिती महापात्रा यांनी दिली.
ते म्हणाले की, चक्रीवदाळचा पुढचा भाग (आर्म) जमीनीला धडकला आहे आणि त्याचा मध्य भाग (आय) आता केव्हाही भूजलवार धडकू शकतो. चक्रीवादळाने दुपारी अडीच वाजता जोरदार धडक दिली. चक्रीवादळ पूर्णपणे धडकण्यास 3-4 तासांचा कालावधी लागेल, असे महापात्रा यांनी सांगितले.

चक्रीवादळ अम्फानशी संबंधित परिस्थिती वेगाना बदलतेय – NDRF
एनडीआरएफचे महासंचालक एस.एन प्रधान यांनी बुधवारी सांगितले की, चक्रीवादळ अम्फानशी संबंधित परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. चक्रीवादळाने किनारपट्टीवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. एस एन प्रधान यांनी सांगितले की, ओडिशामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व 20 पथकांना तैनात राहण्यास सांगितले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 19 टीमला देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. दोन टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रधान म्हणाले की, परिस्थिती वेगाने बदल आहे. चक्रीवादळानंतर आणि आमच्यावर अधिक मोठी जबाबदारी आहे. एनडीआरएफ अम्फान चक्रीवदाळावर बारीक लक्ष ठेवून आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या आपत्तीच्या वेळी अधिक सतर्क राहावे लागणार आहे. ज्या जिल्ह्यात या वादळाचा अधिक प्रभाव असेल त्या ठिकाणी अधिक सतर्क रहावे लागणार आहे.

एनडीआरएफ, गृह मंत्रालय, आयएमडी, आयसीएमआर, अम्फान चक्रीवादळावरील आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना एनडीआरफचे महासंचालक एस एन प्रधान म्हणाले की, वादळाने ओडिशाच्या किनाऱ्यावर धडक देण्यास सुरुवात केली आहे. वादळ संपल्यानंतर आमचे काम सुरु होईल. राज्य सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधील 5 लाख लोकांना आणि ओडिशामधील 1.58 लाख लोकांना वादळापासून वाचवण्यासाठी किनारपट्टी भागातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या प्रमुखांनी सांगितले की, वादळ पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन्सजवळ प्रवेश करत असून वादळ वेगाने पुढे जात आहे. वादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बरीच झाडे पडली आहेत आणि विजेचे खांब पडले आहेत. एनडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतलेली आहे. हावडा आणि हुबळीत जोरदार वारे वाहात असून पाऊस पडत आहे.