30 वर्षांच्या सेवेनंतर आपल्या अंतिम प्रवासासाठी निघणार भारतीय नौदलातील युद्धनौका ‘विराट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलातील युद्धनौका ‘विराट’ शनिवारी आपला अंतिम प्रवास सुरू करणार आहे. विराट युद्धनौका मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड ते गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग पर्यंत अंतिम प्रवास करणार आहे. जिथे तिला अलंग शिप ब्रेकिंग यार्डमध्ये नष्ट केलं जाईल.

भारतीय नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे की, ऐतिहासिक जहाज शुक्रवारी अलंगला रवाना होणार होते, परंतु जाण्यासाठी एक दिवस उशीर झाला आहे. काही कागदोपत्री काम सुरु आहे, त्यानंतर ‘विराट’ युद्धनौका आपल्या प्रवासास निघेल जिथे तिला नष्ट केले जाईल. यासह, भारतीय नौदलाने असे सांगितले की या जहाजाने 30 वर्षे काम केले. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये काम करणाऱ्या आणि नंतर भारतीय नौदलात सामील झालेल्या भारतीय ताफ्यातील ही एकमेव युद्धनौका होती.

प्रवास पूर्ण होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल
‘विराट’ या युद्धनौकेचे संग्रहालयात किंवा रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न केले गेले, परंतु ही योजना अपयशी ठरली. अलंग स्थित श्री राम ग्रुपने जहाज नष्ट करण्यासाठी बोली लावली होती. नौदलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की कंपनीची स्वत:ची उच्च क्षमता असणारी टग्स आहे जी याला अलंगला घेऊन जाण्यास मदत करेल, हा प्रवास पूर्ण होण्यासाठी दोन दिवस लागतील. समुद्रकिनाऱ्यावर असणारं अलंंग शहर जगातील सर्वात मोठं जहाज ब्रेकिंग यार्ड आहे.

महत्त्वाचे म्हणजे गुजरात अलंग शिपयार्डच्या या प्रसिद्ध जागेचा वेगळा नजारा आहे. उंच ठिकाणी उभे राहून, बरेच किलोमीटर आपणास फक्त मोठे जहाज किंवा त्यांची मोडतोड दिसेल. मोडकळीस आलेल्या जहाजांकडे पहात असता, आपण अगदी पहिल्यांदाच अंदाज लावू शकत नाही की ही तीच जहाजे आहेत. जे कधी समुद्रात मोठ्या गतीने प्रवास करत होते. परंतु हे खरं आहे की अलंग शिपयार्ड हा या जहाजांचा शेवटचा प्रवास असतो.