‘शशिकला यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ Facebook, YouTube अन् Google नं हटवावेत’, 2 लाखाचा दंड द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हाय कोर्टानं एआयएडीएमके (ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम) च्या माजी नेत्या शशिकला यांच्या याचिकेवर फेसबुक आणि गुगलला अंतरीम सूचना दिल्या आहेत. यात सोशल मीडियावरून शशिकला यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ हटवण्यास सांगितलं आहे.

न्यायमुर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमुर्ती तलवंत सिंह यांच्या खंडपीठानं या निर्णयासोबतच एकल खंडपीठाच्या 2 जूनच्या त्या निर्मयावरही स्थगिती दिली आहे ज्यात एकल खंडपीठानं शशिकला यांना गुगल, फेसबुक आणि युट्युब यांनी प्रत्येकी 2 लाख रुपये दंड म्हणून द्यावेत अशा सूचना दिल्या होत्या.

सुनावणी दरम्यान गुगल आणि युट्युबकडून बाजू मांडणारे ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी म्हणाले, “खंडपीठाच्या आदेशाचं पालन करत तीनही प्लॅटफॉर्म्स शशिकला यांचे फोटो आणि व्हिडीओ हटवतील.”

2 जून रोजी दिलेल्या एकल खंडपीठाच्या निर्णयात असं सांगण्यात आलं होतं की, सामान्य नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी बंद खोलीत कुणाला भेटतात हे जाणून घेण्याचा त्या नागरिकांना अधिकार आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्या प्रकरणी 2017 साली सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर शशिकला यांना बंगळुरूच्या प्रपन्ना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. शशिकला यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जेलमध्ये विशेष सुविधा मिळाल्यामुळं शशिकला चर्चेत आल्या होत्या.