डॉ. वीरेंद्र कुमार यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची १७ व्या लोकसभेच्या हंगामी सभापतीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ खासदार संतोष गंगवार आणि मनेका गांधी यांची नावं या पदासाठी चर्चेत होती. डॉ. वीरेंद्र कुमार सध्या टिकमगड मतदार संघातून लोकसभा सदस्य आहेत.

वीरेंद्र कुमार सागर लोकसभा मतदार संघातून चार वेळा, तर टीकमगड मतदारसंघातून ३ वेळा असे ७ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. मोदी १.० सरकारमध्ये ते अल्पसंख्याक मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. त्यांनी प्रसिद्ध डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA केलं आणि नंतर बालमजुरी अर्थात Child labour संबंधी विषयात डॉक्टरेट PhD मिळवली.

हंगामी सभापतीचे कार्य –

लोकसभेचे सभापती नियुक्त होण्यापूर्वी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी सभापतींची नियुक्ती केली जाते. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याला हंगामी सभापती बनवले जाते. हंगामी सभापतींचा कार्यकाळ हा फार कमी असतो. नव्या सभापतींची नियुक्ती झाल्यानंतर हंगामी सभापतींचे काम समाप्त होते.

 

 

आरोग्यविषयक वृत्त –

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?